जामखेड तालुक्यातील खर्डा येथील श्री संत सिताराम बाबा उंडेगावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन या सप्ताहात आज दि. २५ रोजी निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदूरीकर महाराजांचा भव्य किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. श्री क्षेत्र सिताराम गड समस्त गावकरी मंडळी , शिवपट्टण च खर्डा पंचक्रोशी श्री ह.भ.प. महालिंग महाराज नगरे यांच्या सहकार्यातून व परिश्रमातून सिद्धसंत सद्गुरु श्री संत सिताराम बाबा यांच्या अष्टम् पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्री चतुर्भुज विष्णु मूर्ती , श्री सद्गुरू सिताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व सुवर्ण कलशा रोपन सोहळा सुरू आहे.
या निमित्ताने आज झालेल्या हभप इंदुरीकर महाराजांच्या किर्तनासाठी शेजारच्या चार ते पाच तालुक्यांमधून हजारो भाविक आले होते. मात्र खर्डा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संभाजी शेंडे, शशी म्हस्के,वैजीनाथ मिसाळ ,उत्तम सोनवणे यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उपस्थित झाला नाही. तसेच दि. २० आॅगस्ट पासून सुरू असलेल्या सप्ताहासही योग्य संरक्षण पुरविण्याचे काम येथील पोलीस स्टाफ करून योग्य प्रकारे केले जात आहे. यामुळे खर्डा येथे पोलीस स्टेशनची आवश्यकता होतीच असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा