जामखेड प्रतिनिधी : २५ आॅगस्ट
स्पर्धा परीक्षेसाठी कोणताही वशिला लागत नसून स्पर्धा परीक्षेत अपयशी झालेले विद्यार्थी हा गैरसमज पसरवितात. आपण मनाने एकदा ठरवले व प्रयत्न सुरू केला. आपल्यात जिद्द, चिकाटी व मेहनत करण्याची तयारी असेल तर पुण्या मुंबईला न जाता तुम्ही जामखेड मध्येच राहुन स्पर्धा परिक्षेत यशस्वी होऊ शकता. असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले.
जामखेड येथिल ल. ना. होशिंग विद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन परीक्षा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अरूण चिंतामणी, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, संस्थेचे सचिव शशिकांत देशमुख, संचालक सैफुल्ला खान, प्राचार्य श्रीकांत होशिंग. उपप्राचार्य पोपट जरे, उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, पर्यवेक्षक रमेश अडसुळ, प्रा.बाळासाहेब कोल्हे, प्रा. समुद्र, पोलीस हेडकॉन्टेबल अविनाश ढेरे, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना पोलीस निरीक्षक गायकवाड म्हणाले की.
प्रत्येक दगडांपासून मुर्ती बनू शकते पण त्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतील. त्यामुळे जिद्द चिकाटी व मेहनत करण्याची तयारी ठेवा यश हमखास मिळणारच. जे जिद्दीने अभ्यास करतात तेच यशस्वी होतात. त्यांना परिस्थिती आडवी येत नाही. स्वतः स्वत:शी स्पर्धा करा, वातावरण तयार करा. कोणताही क्लास न लावता मी जिद्द व चिकाटीमुळे पहिल्याच प्रयत्नात फौजदार झालो. मोबाईलचा वापर करा पण ऑनलाईन क्लासेससाठी स्वत : स्वत : चा मार्गदर्शक बना. असेही मत पो. नि. संभाजी गायकवाड यांनी व्यक्त केले.
यावेळी अध्यक्ष अरूण चिंतामणी, उपप्राचार्य पोपट जरे, प्रल्हाद साळुंखे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वंदना डुचे व प्रमिला पोकळे यांनी तर आभार प्रा. संभाजी शेटे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा