जामखेड तालुक्यातील हळगांव परिसरात करगळ वस्ती या ठिकाणी श्रीनाथ म्हस्कोबा चे भव्य असे मंदिर आहे. या ठिकाणी सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त दोन दिवस धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
या ठिकाणी पारंपरिक ढोल ताशा सनई बँड पथकाच्या निनादात देवाची सजवलेल्या पालखी काढण्यात आली. व त्यानंतर मानाचे मानकरी यांच्या हस्ते देवाला हळद लावुन नाथ मस्कोबा चा व माता जोगेश्वरी चा विवाह सोहळा संपन्न झाला. व यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर पारंपरिक वादयांच्या गजरात देवाचा छबिना निघाला देवाच्या घोषणांनी व फटाक्याच्या आतिषबाजीत परिसर दुमदुमून गेला होता. या ठिकाणी हजारो भाविक उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मानकरी दगडू शिंगाडे म्हणाले की देवावरील श्रद्धेपोटी भाविकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. दादा महाराज करगळ यांचे कार्य चांगले आहे. भाविकांना त्यांनी भक्तिमार्ग दाखवला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातही करगळ महाराज भाविकांची सेवा करतील अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली. तसेच या उत्सवात यावर्षी भाकीत वर्तविले जाते. पाऊस कोणत्या नक्षत्रात किती पडणार आहे शेतकऱ्यांनी कोणते पीक घेतले पाहिजे येणाऱ्या काळात काय खबरदारी घेतली पाहिजे असे भाकित सांगितले जाते आणि यावर शेतकरी बांधवांनी विश्वास असल्याने त्यांनी बोलताना सांगितले.
यावेळी देवस्थानचे प्रमुख दादा महाराज करगळ बोलताना म्हणाले की या ठिकाणी मानाचे सर्व मानकरी आमच्या विनंतीला मान देऊन दरवर्षी येतात व हा उत्सव पार पडतात. आणि मानकरी हा या कार्यक्रमाचा प्रमुख घटक आहे. ते जे बोलतात त्याच पद्धतीने आम्ही धार्मिक कार्यक्रम करत आहोत. तसेच विविध भागातून येणाऱ्या भाविकांच्या मदतीने हे तीर्थक्षेत्राचा विकास झाला आहे. या ठिकाणी श्रद्धेने भाविक येतात व देवाला साकडे घालतात त्यामुळे त्यांच्या जीवनातील अडचणी सुटतात त्यासाठी भाविकांनी देवावर भाव ठेवला पाहिजे. या ठिकाणी सर्व मानकरी भाविक भक्तांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी या कार्यक्रमाचे मानकरी दगडू शिंगाडे, नाना तरडे, बापु बुरुंगले, लाला हटकर, पोपट ढवाण, राऊस जमदाडे, हनुमंत जमदाडे, भाविक. कैलास रसाळ, शिवाजी लटपटे, बाळासाहेब वीर, खंडू तांबे, मल्हारी तांबे, महादेव तांबे, तेजस तांबे, नाना मोरे, मधु लांडे, धुळा तांबे, यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा