जामखेड प्रतिनधी/१३मे२०२५
जामखेडमध्ये मानवी आरोग्यास हानिकारक अशा गुटखा व पानमसाल्याची विक्री खुलेआम चालू असताना पोलिसांनी त्यावर छापा टाकला. या छाप्यात २२,१८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, मात्र आरोपी फरार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हे प्रकरण खर्डा रोडवरील जनता ट्रेडर्स नावाच्या दुकानातील असून, आरोपी 1) फजल उमर कुरेशी 2)अजियान रफिक कुरेशी यांनी जामखेड सदाफुले वस्तीतील या दुकानातून गुटखा विक्री करत असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी 12 मे 2025 रोजी या दुकानावर छापा टाकून गुटखा व पानमसाल्याची विक्री सुरू असल्याचे ओळखले. या प्रकरणी आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असताना, ते अद्याप फरार असल्याची चर्चा जामखेड तालुक्यात सुरू आहे. पोलिसांना मुद्देमाल मिळतो पण आरोपी मिळत नाहीत, यामुळे पोलिसांच्या कारवाईवर नागरिकांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
सदर प्रकरणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आणि आरोपींवर गु.रं.क्र व कलम.257/2025 बीएनएस 2023 चे कलम 123,123,274,275 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपी अटकेत नाहीत, यामुळे नागरिकांमध्ये विविध प्रश्न व चर्चा सुरू असून पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.
बुधवार, १४ मे, २०२५
Home
जामखेड पोलीस स्टेशन
जामखेडमध्ये गुटखा विक्रीचा भांडाफोड, मुद्देमाल जप्त पण आरोपी फरार,आरोपी फरार तरी मुद्देमाल जप्त?
जामखेडमध्ये गुटखा विक्रीचा भांडाफोड, मुद्देमाल जप्त पण आरोपी फरार,आरोपी फरार तरी मुद्देमाल जप्त?
Tags
# जामखेड पोलीस स्टेशन
About Unknown
जामखेड पोलीस स्टेशन
Labels
जामखेड पोलीस स्टेशन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड
संपादिका-सा.पोलीस वारंट
मो नंबर-९९७०५२९६९७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा