जामखेड प्रतिनधी११मे२०२५
बीड जिल्ह्यातील बार्शी नाका परिसरातील एका लग्न सोहळ्यात रस्त्यावर जास्त आवाजात वाजणाऱ्या डीजेला बंद करण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिस निरीक्षकांवर हल्ला झाला. या घटनाक्रमात पोलिस निरीक्षकांच्या हाताला जखम झाली असून आरोपीला ताब्यात घेतले गेले आहे.
वार शुक्रवारी सायंकाळी बार्शी नाका परिसरात एका विवाह सोहळ्यात डीजेचा आवाज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाजत होता. स्थानिक पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी हा आवाज कमी करण्यासाठी डीजे बंद करण्यास सांगितले. मात्र, डीजेच्या चालकाने सांगितलेले ऐकले नाही आणि त्यावरून निरीक्षकांनी डीजे वाहनाची चावी काढली. यावरून नवनाथ उडाण (वय ४०, बार्शी नाका, बीड) या व्यक्तीने निरीक्षकांशी वाद घातला आणि शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यामुळे निरीक्षकास उजव्या हाताला जखम झाल्याचे तसेच त्यांचा चष्मा व नेमप्लेट तुटले.
हा प्रकार झाल्यानंतर परिसरात गर्दी झाली. मुदिराज यांनी त्वरित आपल्या पोलिसांना बोलावून नवनाथला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्याला बार्शी नाका पोलिस चौकीत ठेवण्यात आले. आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याच्या प्रक्रिया सुरू आहेत. तसेच हा डीजे जप्त केला जाईल, अशी माहिती निरीक्षकांनी दिली.
डीजे बंद केल्यानंतर नवनाथने दुसऱ्या चावीने डीजे पुन्हा सुरू करून वेगाने निघून जाण्याचा प्रयत्न केला. हा डीजे जामखेड येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी नवनाथला ताब्यात घेतल्यानंतर तो दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात आले. एसपी नवनीत काँवत माझे मित्र आहेत. माझ्या महाराष्ट्रात ओळखी आहेत. एका राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्षही माझा नातेवाइक आहे. माझा चुलत भाऊ नगरसेवक आहे, माझे कोणीच काही करू शकत नाही, अशा धमक्याही तो चौकीत बसून पोलिसांनाच देत होता.
आरोपी दारूच्या नशेत असल्याचा देखील पोलिसांनी उल्लेख केला. पण पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवून पुढील कारवाई केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा