महाराष्ट्राला रोहित पवारांसारखा शिक्षणमंत्री मिळाल्यास मुलांचे भविष्य उज्वल - मनीष सिसोदिया - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४

Home राजकीय बातम्या महाराष्ट्राला रोहित पवारांसारखा शिक्षणमंत्री मिळाल्यास मुलांचे भविष्य उज्वल - मनीष सिसोदिया

महाराष्ट्राला रोहित पवारांसारखा शिक्षणमंत्री मिळाल्यास मुलांचे भविष्य उज्वल - मनीष सिसोदिया

शनिवार, सप्टेंबर २१, २०२४ राजकीय बातम्या,
पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२१सप्टेंबर

भारत देशात शिक्षण क्षेत्रात काम झाले पाहिजे तरच देशाचे उन्नती होईल शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍यांनाच मतदान केले पाहिजे व त्यावरच राजकारण झाले पाहिजे कर्जत जामखेड मतदारसंघात आ रोहित पवार यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे असे नेते दुर्लभ असतात अशा नेत्यांना पुन्हा संधी द्या असे आवाहन दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनी केले.

जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेच्या दहा वर्ग खोल्यांचे भूमिपूजन मनीष सिसोदिया यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी आ. रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते नितीन कराळे, राज्य सरचिटणीस राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, सूर्यकांत मोरे, अमोल राळेभात,प्रशांत राळेभात, बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा,शहराध्यक्ष अजय भोसले, सुंदर परदेशी, बजरंग सरडे, कर्जत तालुकाध्यक्ष शंकर शिंदे, चंद्रकांत अधूरे, संजय सदाफुले, दीपक शेळके, ऋषिकेश गांगर्डे,अँड बिपिन वारे, समीर मनियार, चंद्रकांत वनवे, अंगद ढवळे, राजेंद्र गोरे, उमर कुरेशी, प्रकाश काळे, प्रकाश सदाफुले, आदि उपस्थित होते.
यावेळी मनीष सिसोदिया बोलताना म्हणाले की, मी अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थळी चोंडी येथील जन्मस्थळाचे दर्शन घेतले. ज्या भूमीत अहिल्याबाईंनी जन्म घेतला त्या भूमीत मला येण्याचे भाग्य लाभले. मी स्वतःला भाग्यवान समजतो.
राजकारणात एका पक्षाचा नेता दुसर्‍या एका पक्षाच्या नेत्याला एका शाळेचे उद्घाटन करण्यासाठी बालावतो हे आमदार रोहित पवार यांच्यामुळे पहायला मिळाले. मला दिल्लीहून या ठिकाणी बोलावून घेतले ही असामान्य घटना आहे. आम्ही दिल्लीमध्ये शैक्षणिक क्षेत्रात काम करतांना सरकारी शाळेची अवस्था फार बिकट होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व मी ठरवले आणि दिल्लीत चांगल्या पद्धतीने शाळा बांधल्या. शिक्षकांना बाहेरच्या देशात प्रशिक्षणासाठी पाठवले. आज दिल्लीमध्ये शैक्षणिक क्षेत्रात फार मोठा बदल झाला आहे खाजगी ट्युशन न लावता केवळ शाळेतील शिक्षणाच्या बळावर आमचे मुलं आज सीईटी जे डबल इ नीट सारख्या परीक्षा चांगल्या मार्काने पास होत आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक साधुसंतांनी जन्म घेतला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले तसेच थोर संतांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले. परंतु या देशात शिक्षणावर अजून पर्यंत चांगले काम झालेले दिसून येत नाही देशात शिक्षणावर मोठे काम होण्याची गरज आहे. जर सरकारी शाळेमध्ये उत्तम दर्जाचे शिक्षण मिळाले तर या देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही व भारत प्रगतशील देश होईल जो शिक्षण क्षेत्रावर काम करतो त्या नेत्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आमदार रोहित पवार हे दिल्लीला माझ्या भेटीला आले होते. त्यांनी आम्ही केलेल्या कामाची पाहणी केली. एका नेत्याने दुसर्‍या नेत्याकडून काहीतरी शिकले पाहिजे रोहित पवार यांच्याकडे काम करण्याचे कौशल्य आहे हा कामाचामाणूस आहे असे माणसं दुर्लभ असतात तेव्हा आ रोहित पवार या माणसाला पुन्हा संधी दिली पाहिजे. यावेळी आ रोहित पवार म्हणाले मी शालेय साहित्य व सायकली विद्यार्थ्यांना वाटल्या म्हणून माझ्यावर विरोधक टीका करतात निवडणुकीला आल्यानंतर राजकारण केले पाहिजे परंतु निवडून आल्यानंतर पाच वर्षे राजकारण व भेदभाव बाजूला ठेवून काम केले पाहिजे. जामखेड शहरातील सर्वात जुनी असलेली मराठी मुलींची शाळा या शाळेसाठी मला इमारत उभारता आली आता मुलांच्या शाळेसाठी सुद्धा मी मंजुरी मिळवली असून अजून 20 ते 22 नवीन खोल्या पुढील एका वर्षात या ठिकाणी उभ्या करु असे आश्‍वासन यावेळी त्यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक शिवाजी राळेभात यांनी केले तर सुजित उबाळे यांनी सूत्रसंचालन केले.
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at शनिवार, सप्टेंबर २१, २०२४
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • मोठी बातमी: अवैध वसुलीचा व्हिडीओ व्हायरल; शेंडी बायपासवर ट्रकचालकांकडून पैसे घेताना पोलीस निलंबित
    अहिल्यानगर (दि. ११ सप्टेंबर) –  आहिल्यानगरमधिल शेंडी बायपास परिसरात ट्रकचालकांकडून अवैधरित्या पैसे गोळा करणाऱ्या प्रकरणाचा व्ह...
  • धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनिधी/१८ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवा...
  • जामखेड बसस्थानकाजवळ बेवारस मृतदेह सापडला, संजय कोठारी यांनी पोलिसांना दिली माहिती ,परिसरात खळबळ
    जामखेड प्रतिनधी/8सप्टेंबर2025 जामखेड येथील बसस्थानकावरील शेडमध्ये एका अंदाजे ७५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले प...
  • ब्रेकिंग न्यूज : अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणलेखर्डा हद्दीत स्थानीक गुन्हे शाखेचा छापा, तिरट जुगार अड्ड्यांवर ४० जण ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त
    खर्डा प्रतिनधी/सप्टेंबर2025 अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवा...
  • ५ लाख रुपयांच्या बनावट नोकरी फसवणुकीचा खर्डा पोलिसांकडून पर्दाफाश;२ वर्षे फरार आरोपी मुरलीधर नेटके नवी मुंबईतून अटक
    खर्डा प्रतिनधी/१७सप्टेंबर२०२५ खर्डा पोलीसांनी नोकरीचे आमिष दाखवून ५ लाख रुपयांची फसवणूक करणा-या फरार आरोपी मुरलीधर धर्मा नेटके र...
  • अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गावातून अपहरण करून पनवेलला नेले, मुख्य आरोपी अटकेत! परिसरात खळबळ!
    जामखेड प्रतिनिधी / ५ ऑक्टोबर २०२५ आष्टी तालुक्यातील एका गावातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने चारचाकी वाहनातून उचलून तिच...

Popular Posts

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले पोलीस सेवेतून बडतर्फ

जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पालकमंत्र्यांचा दणका: निर्भयपणे अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू करा- राधाकृष्ण विखे पाटील

मोठी बातमी :स्थानिक गुन्हे शाखेचे धडाकेबाज कामगिरी! जामखेडमध्ये गोळीबार करणारे 6 आरोपी 24 तासाचे आत जेरबंद

जामखेड: पाळीव जनावरे नागरिकांनी मोकाट सोडू नये अन्यथा नगरपरिषदेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार - मुख्याधिकारी अजय साळवे

जामखेडमध्ये शांतता सुरक्षिततेसाठी श्री नागेश्वर यात्रेपूर्वी शांतता समिती बैठक संपन्न

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *