पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२३सप्टेंबर
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथे सरकारने ओबीसीतून मराठा आरक्षण द्यावे यासाठी पुन्हा आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून सकल मराठा समाजाकडून अनेक जिल्हे बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा बंदची घोषणा सकल मराठा समाजाकडून करण्यात आली होती.
त्याच पार्श्वभूमीवर आज खर्डा शहर मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता खर्डा शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment