रब्बी हंगामासाठी गहू उत्पादक शेतकऱ्यांना निविष्ठांचं वाटप,राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं आयोजन - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

शनिवार, १४ डिसेंबर, २०२४

Home राजकीय बातम्या रब्बी हंगामासाठी गहू उत्पादक शेतकऱ्यांना निविष्ठांचं वाटप,राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं आयोजन

रब्बी हंगामासाठी गहू उत्पादक शेतकऱ्यांना निविष्ठांचं वाटप,राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं आयोजन

शनिवार, डिसेंबर १४, २०२४ राजकीय बातम्या,

पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१४ डिसेंबर

 कर्जत-जामखेड मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून बारामती अॅग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जवळके आणि पिंपळगाव उंडा या गावातील अनुसूचित जाती-जमातीतील गहू पीक उत्पादक शेतकरी बांधवांना रब्बी हंगामासाठी 'SC-SP प्रकल्पा'अंतर्गत निविष्ठांचं वाटप करण्यात आलं. यावेळी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना गहू पीक उत्पादन वाढीसंदर्भात विविध विषयांवर मार्गदर्शन केलं.
 कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांच्या माध्यमातून कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पीक उत्पादन वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले जातात, विविध उपाययोजना राबवल्या जातात, त्यासाठी शेतीविषयक तज्ज्ञांना बोलावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. त्याचाच भाग म्हणून अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्र बारामती, आघारकर संशोधन केंद्र आणि कर्जत-जामखेड इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेडमधील जवळके आणि पिंपळगाव उंडा या गावांमध्ये अनुसूचित जाती-जमातीतील गहू उत्पादक शेतकरी बांधवांना रब्बी हंगामातील निविष्ठांचं वाटप करण्यात आलं. जवळके गावातील 35 शेतकऱ्यांना आणि पिंपळगाव उंडा येथील 15 शेतकऱ्यांना या उपक्रमातून निविष्ठा देण्यात आल्या. यावेळी रब्बी हंगामातील पीक नियोजन आणि बदलत्या हवामानातील आव्हानांवर मात करत शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी डॉ. विवेक भोईटे, आघारकर संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. विजेंद्र बाविस्कर आणि पीक रोग शास्त्रज्ञ डॉ.सुधीर नवाथे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. डॉ.भोईटे यांनी रब्बी हंगामातील पीक नियोजन, तूर व कांदा या पिकांवरील व्यवस्थापन व वातावरणाशी जुळवून घेत उत्पादनवाढीबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. बाविस्कर आणि डॉ.नवाथे यांनी गव्हाची लागवड, नवनवीन विकसित वाणांची माहिती तसेच गहू पिकावरील रोग व कीड नियंत्रण आणि त्यावरील उपाययोजनांवर शेतकऱ्यांसोबत सविस्तर चर्चा चर्चा केली.
या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र (बारामती) आणि आघारकर संशोधन केंद्राच्या तज्ज्ञांनी सहभाग घेतला तसेच  जवळके विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री. कांतीलाल वाळुंजकर, पिंपळगाव उंडाचे माजी सरपंच मच्छिंद्र भालेराव, प्रगतशील शेतकरी सौ. साळवे, प्रकल्प समन्वयक ओंकार ढोबळी, रमेश पवार यांसह जवळके व पिंपळगाव उंडा येथील शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून आणि त्यांचे वडील राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती आणि शाश्वत शेतीकडे वळण्याची नवी दिशा मिळाली. हा उपक्रम शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्यास निश्चितच मदत करेल, असा विश्वास व्यक्त यावेळी व्यक्त करण्यात आला. यापूर्वीही राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत जामखेड मतदारसंघात शेतीत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. गेली पाच वर्ष तूर , कांदा, द्राक्ष, डाळिंब, उडिद यासह विविध पिकांच्या उत्पादन वाढीसाठी त्यांनी वेगवेगळ्या कार्यशाळा घेतल्या आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं. तसंच आवश्यक त्या ठिकाणी आभ्यास दौरे काढून आधुनिक पद्धतीने शेती करून उत्पादनात वाढ कशी करावी याबाबत मार्गदर्शन केलं आणि त्याचे दृश्य परिणाम दिसून आले आहेत. विशेषतः कांदा, तूर, उडिद  या पिकांच्या बाबतीत कर्जत जामखेड मतदारसंघात अमुलाग्र बदल होऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उत्पादनात वाढ केली आहे. हे सर्व सर्वस्वी राजेंद्रदादा पवार यांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांनी घेतलेली मेहनत याचं हे यश आहे.
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at शनिवार, डिसेंबर १४, २०२४
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • मोठी बातमी: अवैध वसुलीचा व्हिडीओ व्हायरल; शेंडी बायपासवर ट्रकचालकांकडून पैसे घेताना पोलीस निलंबित
    अहिल्यानगर (दि. ११ सप्टेंबर) –  आहिल्यानगरमधिल शेंडी बायपास परिसरात ट्रकचालकांकडून अवैधरित्या पैसे गोळा करणाऱ्या प्रकरणाचा व्ह...
  • धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनिधी/१८ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवा...
  • जामखेड बसस्थानकाजवळ बेवारस मृतदेह सापडला, संजय कोठारी यांनी पोलिसांना दिली माहिती ,परिसरात खळबळ
    जामखेड प्रतिनधी/8सप्टेंबर2025 जामखेड येथील बसस्थानकावरील शेडमध्ये एका अंदाजे ७५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले प...
  • ब्रेकिंग न्यूज : अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणलेखर्डा हद्दीत स्थानीक गुन्हे शाखेचा छापा, तिरट जुगार अड्ड्यांवर ४० जण ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त
    खर्डा प्रतिनधी/सप्टेंबर2025 अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवा...
  • ५ लाख रुपयांच्या बनावट नोकरी फसवणुकीचा खर्डा पोलिसांकडून पर्दाफाश;२ वर्षे फरार आरोपी मुरलीधर नेटके नवी मुंबईतून अटक
    खर्डा प्रतिनधी/१७सप्टेंबर२०२५ खर्डा पोलीसांनी नोकरीचे आमिष दाखवून ५ लाख रुपयांची फसवणूक करणा-या फरार आरोपी मुरलीधर धर्मा नेटके र...
  • अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गावातून अपहरण करून पनवेलला नेले, मुख्य आरोपी अटकेत! परिसरात खळबळ!
    जामखेड प्रतिनिधी / ५ ऑक्टोबर २०२५ आष्टी तालुक्यातील एका गावातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने चारचाकी वाहनातून उचलून तिच...

Popular Posts

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

मोठी बातमी :स्थानिक गुन्हे शाखेचे धडाकेबाज कामगिरी! जामखेडमध्ये गोळीबार करणारे 6 आरोपी 24 तासाचे आत जेरबंद

निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले पोलीस सेवेतून बडतर्फ

जामखेड: पाळीव जनावरे नागरिकांनी मोकाट सोडू नये अन्यथा नगरपरिषदेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार - मुख्याधिकारी अजय साळवे

जामखेडमध्ये शांतता सुरक्षिततेसाठी श्री नागेश्वर यात्रेपूर्वी शांतता समिती बैठक संपन्न

जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पालकमंत्र्यांचा दणका: निर्भयपणे अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू करा- राधाकृष्ण विखे पाटील

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *