नेवासा (प्रतिनिधी) -२६ डिसेंबर २०२४
सरत्या वर्षाला निरोप व नविन वर्षाच्या स्वागतासाठी तसेच चर्च ऑफ गॉड या चर्चच्या ६० व्या,वर्धापण दिनानिमित्त नेवासा फाटा येथील चर्च ऑफ गॉडच्यावतीने युवा पर्यावरणाचा समाजात एक चांगला संदेश देत या चर्चच्या सदस्यांनी नेवासा फाटा येथे पविञ नाताळ सणानिमित्त स्वच्छता अभियान राबवून केलेले काम मोठे कौतुकास्पद असल्याचे गौरोद्गार आमदार विठ्ठलराव लंघे - पाटील यांनी केले.
नेवासा फाटा येथील चर्च ऑफ गॉडच्यावतीने बुधवार (दि.२५) रोजी नविन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यावरणासाठी पुढाकार घेवून सामाजात एक चांगली जागरूकता पसरविण्याचे काम करुन चर्चच्या सर्व महीला - पुरुष, युवक - युवती या सदस्यांनी संपुर्ण नेवासा फाटा परिसरात स्वच्छता अभियान राबविले या चर्चच्या सर्व सदस्यांचे काम समाजाला एक प्रेरणादायी असल्यामुळे आमदार विठ्ठलराव लंघे - पाटील यांनी चर्च ऑफ गॉडचे अध्यक्ष विजय धनराज बिजोरे व सदस्यांचे झालेल्या कार्यक्रमात मोठे कौतुक करुन त्यांचा सन्मान केला.
२५ डिसेंबर या तारखेला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संघटनाने अहिल्यानगर जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात हरित पृथ्वी प्रकल्प उपक्रम राबवित या परिसराला स्वच्छ व आनंददायक ठिकाणामध्ये रूपांतरित केले व युवांनी त्यांच्या सुट्ट्यांचा उपयोग परिसराची स्वच्छता साधण्यासाठी केली असल्यामुळे त्यांच्या या चांगल्या उपक्रमाचे आमदार विठ्ठलराव लंघे - पाटील यांनी झालेल्या कार्यक्रमात मोठे कौतुक केले या कार्यक्रमाप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शंकरराव लोखंडे,डॉ. बाळासाहेब कोलते,डॉ.अशोकराव झरेकर,मुकिंदपूरचे सरंपच दादा निपुंगे,दादा विधाटे,रमेश सांवत,प्रकाश निपुंगे,माजी उपसरपंच गणेश माटे,अॅड.अशोकराव करडक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
चौकट
नेवासा फाटा परिसरात चर्च सदस्यांनी दोन किलोमीटर लांबीच्या भागाची स्वच्छता करत संपुर्ण परिसर स्वच्छ केला त्यामुळे या चर्च सदस्यांचे समाजातून मोठे कौतुक केले जात आहे चर्चचे अध्यक्ष विजय धनराज बिजोरे
सहकारी अमोल भाकरे,बन्यामीन सुनील मकासरे,
सतीश साळवे,धीरज रणनवरे, सागर साळवे यांच्यासह चर्च सदस्य या स्वच्छता उपक्रमात सहभागी झाले होते या चांगल्या उपक्रमाचे आ.लंघे यांनी कौतुक करुन विजय बिजोरे यांना प्रशिस्तीपञ दिले.
No comments:
Post a Comment