पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/५ डिसेंबर २०२४
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे राष्ट्रीय जंत नाशक दिनानिमित्त १ ते १९ वयोगटातील लहान बालकांत आरोग्य विभागामार्फत जंत नाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. लहान मुलांना पोटातील जंतापासून इतर आजारांची लागण होवू नये व बालकांचे या आजारापासून संरक्षण व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येतात. त्यात खर्डा शहरात जंत नाशक दिन आरोग्य केंद्र व सर्व उपकेंद्र,तसेच शहरातील प्राथमिक शाळा,अंगणवाडी, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा,माध्यमिक शाळा तसेच विना अनुदानित शाळेत शिक्षण घेणाऱ्या १ ते १९ वयोगटातील बालकांना मोफत जंत नाशक गोळ्यांचे वाटप करण्यात यावे असे उद्धिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आरोग्य विभागाने बालकांना जंत नाशक गोळ्यांचे राष्ट्रीय जंत नाशक मोहिमेचा उद्देश १ ते १९ वयोगटातील सर्व मुलामुलींना अंगणवाडी व शाळा या ठिकाणी जावून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे. तसेच पोषणस्थिती शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे.१ ते १९ वयोगटातील बालकांना मोफत जंत नाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी खर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.अजित देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले लहान मुलांचा शैक्षणिक विकास होण्याबरोबरच शारीरिक विकास होणेही महत्त्वाचे असते. त्यासाठी मैदानी खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात. मैदानात खेळत असताना मुलांकडे नीट लक्ष न दिल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते ते. त्यामध्ये कृमीदोष हा लहान वयात सहज होणारा व गंभीर आजार आहे. कृमीदोष बालकांना शारीरिकदृष्ट्या कमकुवत करतो. याचा थेट दुष्परिणाम बालकांच्या शारीरिक व वैयक्तिक विकासावर होतो. वैयक्तिक व आजूबाजूच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे तसेच दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे कृमीदोषांचा संसर्ग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कृमीदोष हे कुपोषण व रक्तक्षयाचे कारण असल्यामुळे कृमीदोष आढळणारी मुले ही नेहमी अशक्त व थकलेली असतात तसेच यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढही खुंटते. त्यामुळे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते.त्यामुळे एकही बालक जंत नाशक गोळी पासून वंचित राहणार नाही तसेच . राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा मूळ उद्देश १ ते १९ वयोगटातील सर्व मुले व १ ते १९ वर्ष वयोगटातील शाळेत जाणाऱ्या व शाळेत न जाणाऱ्या सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देणे हा आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले होऊन पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल. असे डॉ.अजित देशमुख यांनी सांगितले यावेळी शिक्षक, शिक्षिका ,आरोग्य विभाग डॉ., कर्मचारी , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा