" काला म्हणजे आपल्या जीवाचे त्या ईश्वरासी ऐक्य. काल्याच्या किर्तनात केवळ भगवान श्रीकृष्णाचे गोकुळातील चरित्र उच्चारावे" असे प्रतिपादन श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री विठ्ठल महाराज यांनी केले.जामखेड शहरालगत असलेल्या जमादारवाडी येथील श्री संत वामनभाऊ गड या ठिकाणी सूरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री.विठ्ठल महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने बुधवारी सांगता झाली यावेळी त्यांनी आपले विचार मांडले.
संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री.विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दहा वर्षापासून जमादारवाडी जामखेड येथे भव्य सप्ताहाचे आयोजन केले जाते.महंत विठ्ठल महाराज यांनी कान्होबा महाराज यांनी
चुराचुराकर माखन खाया ।
गौळणीका नंद कुमार कन्हया ॥
या हिन्दी गौळणी वर किर्तन केले. ते म्हणाले "संत वामनभाऊ महाराज यांची आज हजारो ठिकाणी पुण्यतिथी साजरी होत आहे. आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आपण भाग्यवान आहोत. कारण याच जन्मात ईश्वर प्राप्ती करून घेता येते. मनुष्य जन्माला येऊन ज्यांना परमार्थ करता आला नाही त्यांचे जीवन निरर्थक आहे. प्रत्येकाने स्वतःचा उद्धार करून घेतला पाहिजे. कारण शेवटी कोणीही आपल्या उपयोगी येत नाही. जीवाचे ब्रह्मासी ऐक्य करणे हा या मानव देहाचा मुख्य हेतू असला पाहिजे. मात्र माणूस हा अन्य ठिकाणी भरकटलेला आहे. सामान्य जीवाला या भवनदीतून तरुण जायचे असेल तर त्यांना संतांचे मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. म्हणून संतांना शरण गेल्याशिवाय तुमचा उद्धार होणार नाही." अनेक संतांचे प्रमाणे श्लोक आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्यातून विठ्ठल महाराज यांनी वरील विषयी जमलेल्या श्रौत्यांना अतिशय उत्तमरीत्या मार्गदर्शन केले. काल्याच्या कीर्तनाविषयी बोलताना ते म्हणाले काल्याच्या कीर्तनात कीर्तनकारांना मर्यादा असतात काल्याच्या कीर्तनात केवळ भगवान श्रीकृष्णाचे चरित्र वर्णन करायचे असते. अन्य कोणतेही विषय या वेळेला घ्यायचे नसतात. असे सांगून महाराजांनी यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांचे वर्णन केले यावेळी सुंदर अशा गवळणी व संतांची प्रमाणे गायकांनी सादर केले त्यामुळे अतिशय भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
शेवटी,
शिंके लावियेले दूरी l होतो तिघांचे मी वरी ll
हा दहीहंडीचा अभंग घेऊन श्री विठ्ठल महाराज यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली व आरती करून नंतर महाप्रसादाने या उत्सवाची सांगता झाली.
या वेळी ह.भ.प. दादासाहेब महाराज सातपुते,मृदगांचार्य बाळकृष्ण महाराज राऊत, हरिदास गुंड, अंगद महाराज ढोले, जगन्नाथ धर्माधिकारी, नारायण काळे तसेच पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळांनी साथसंगत केली.
तसेच हा उत्सव यशस्वी करण्यासाठी कैलास नेटके विजय गदादे, बाळासाहेब आजबे, संतोष बारगजे अशोक वीर पांडुरंग कदम किरण आजबे, उध्दव आजबे, आण्णासाहेब नेटके, अर्जुन नेटके, आनिल नेटके, हरीभाऊ कदम, गौतम आजबे, सुनील कदम, अशोक कदम, अमोल नेटके आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment