माळीनगर(प्रतिनिधी)-१३ सप्टेंबर
माळीनगर येथील दि माॅडेल विविधांगी प्रशालेत आयोजित केलेल्या माळशिरस तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात १०२ शाळांमधून ३३४ उपकरणांसह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याने या विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. .
जि.प.सोलापूर व पंचायत समिती माळशिरस शिक्षण विभाग आणि दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी यांचे संयुक्त विद्यमाने सोमवार दि.१२ व दि १३ सप्टें या कालावधीत येथील मॉडेल विविधांगी प्रशालेत ४९ व्या माळशिरस तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांच्या हस्ते व दि सासवड माळी शुगर फॅक्टरी चे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र गिरमे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी शुगरकेन सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे , सरपंच अभिमान जगताप,उपसरपंच नागेश तुपसौंदर्य,संग्राम भोसले,संस्थेचे सचिव ॲड.सचिन बधे , व्हा.चेअरमन प्रकाश गिरमे , खजिनदार नितीन इनामके , विश्वस्त चंद्रकांत जगताप , संचालक अजय गिरमे, पृथ्वीराज भोंगळे, दिलीप इनामके ,लिना गिरमे, ज्योती लांडगे , सोसायटीचे संचालक जयवंत चौरे,मनिष रासकर, विस्तार अधिकारी हर्षवर्धन नाचणे , सायरा मुलाणी ,केंद्र प्रमुख राजेंद्र जाधव , प्राचार्य गिरीश ढोक ,उपप्राचार्य प्रकाश चवरे, शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी, मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख राजेंद्र गिरमे बोलताना म्हणाले,दोन वर्षांनंतर शाळा सुरळीत सुरू झाल्या आहेत परंतु दोन वर्षे ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कितपत समजले हा मोठा प्रश्न असून नववी नंतरच्या वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळली असून यासाठी शाळा पातळीवर शिक्षकांनी गत दोन वर्षांतील अभ्यासक्रमांची उजळणी घेण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले . सदरचे विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील १०२ शाळांमधून ६ वी ते ८ वी गटात १८० उपकरणे,९ वी ते १२ वी गटात १५४ उपकरणे आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी ८ असे एकूण ३४२ उपकरणांसह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून कोरोना महामारीच्या नंतर प्रथमच विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन झाल्याने विद्यार्थी व शिक्षक यांच्या मध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गिरीश ढोक व सूत्रसंचालन रामहरी वायचळ यांनी केले तर आभार रितेश पांढरे यांनी मानले.
No comments:
Post a Comment