खर्डा प्रतिनिधी :
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आपल्या दक्षिण मतदारसंघाचे लोकप्रिय खा. सुजय विखे यांच्या निधीतून उभे राहात असलेल्या शनी मारूती मंदिराच्या सभामंडप कामाचे भुमीपुजन करण्यात आले.
यावेळी भाजपचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रविद्र सुरवसे, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश खिंवसरा खर्डा ग्रामस्थ व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
येथील शनी मंदिरासाठी सभामंडप व्हावे ही भाजपा नेते रविंद्र सुरवसे, खर्डा ग्रामस्थ पदाधिकारी व भाविकांची अनेक वर्षापासून मागणी होती. त्यानुसार नगर दक्षिणेचे खा. सुजय विखे यांनी या सभामंडपासाठी नऊ लाख रुपये देऊन ही मागणी पुर्ण केली. त्यानुसार आज दि. ५ सप्टेंबर रोजी भा नेते रविंद्र सुरवसे व मान्यवरांच्या उपस्थितीत भुमीपुजन करण्यात आले.
No comments:
Post a Comment