सिद्धटेक प्रतिनिधी : ४ सप्टेंबर
कर्जत तालुक्यातील सिद्धटेक ग्रामपंचायत व चिंतामण सांगळे यांनी सिद्धटेक शहरातील वडार वस्ती येथील बंधारे भरण्यासाठी घोड कॅनलला पाणी सोडण्यात यावी अशी मागणी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आ. प्रा. राम शिंदे यांच्याकडे केली होती. त्या नुसार कार्यतत्परत आमदार आ. प्रा. राम शिंदे यांनी यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याबाबत दिलेल्या सुचने नंतर आवघ्या दोनच दिवसात आज दि. ४ सप्टेंबर रोजी
सिद्धटेक वडार वस्ती बंधाऱ्यांत घोड कॅनलचे पाणी दाखल झाले आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
आ. प्रा. राम शिंदे यांच्या या कामगिरीमुळे नागनाथ जाधव, सारंग नलगे, युवा नेते सचिन बनकर, बंडा मोरे, रमेश शेळके, पोपट मोरे, सखाराम तांदळे,लता सोमनाथ सांगळे, सिद्धटेक ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्राध्यापक आमदार राम शिंदे यांचे मनापासून आभार मानले आहेत.
No comments:
Post a Comment