जामखेड प्रतिनिधी :११ आॅक्टोबर
बारामती ॲग्रोच्या शेटफळगडे हा कारखाना शासकीय नियमाप्रमाने दिलेल्या वेळेच्या अगोदर चालू केला असता साखर आयुक्त यांना नियम मोडल्याबद्दल त्या कारखान्यावर योग्य ती कार्यवाही करावी यासाठी काल दि. १० ऑक्टोबर रोजी आ. राम शिंदे यांनी निवेदन दिले.
आ. राम शिंदे यांनी साखर आयुक्त, पुणे यांना कारवाईच्या मागणीचे निवेदन दिल्यानंतर जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खर्डा येथे आ.प्रा.राम शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली परंतु कार्यकर्ते आ.रोहित पवार यांना खुश करण्यासाठी चमकोगिरी करत असल्याची टीका पै.शरद कार्ले यांनी केली आहे.
एकंदरीत शासकीय नियम मोडून कारखाना आधी चालू करायचे आणि आपल्या जवळच्या लोकांचा ऊस तोडून घ्यायचा आणि नंतर उशीर झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा ऊस राहिला आहे त्यांच्याकडून कमी भावामध्ये ऊस खरेदी करायचा अशी पध्दत या सरंजामी कारखानदारांनी चालू केली आहे. वास्तविक नियम हे सर्वांना
सारखेच असेल पाहिजेत. यांच्या या मनमानी कारभाराला विरोध करत आ.राम शिंदे यांनी कारवाई करण्यासाठी निवेदन दिलेले आहे.
ऊसाचा हंगाम संपत येतो तरी देखील सभासदांचा ऊस तोडला जात नाही आणि शेतकऱ्याला अडचणीत आणलं जातं. अशावेळी शेतकऱ्यांना ऊस तोडण्यासाठी त्या टोळी मलकाला व कारखान्याच्या लोकांना पैसे द्यावे लागतात आणि ऊस तोडून घ्यावा लागतो. मग याच काळात या शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते व कमी भावामध्ये ऊस खरेदी करण्याचे काम हे कारखानदार लोक करत असतात. याच्याच विरोधात आ.प्रा.राम शिंदे यांनी शेतकऱ्यांची पिळवणूक होणार आहे ती थांबवावी याकरिता हे निवेदन दिलेले आहे. परंतु आमदाराच्या समोर कुठलंही विकासकाम प्रसिद्धीसाठी नाही. व या कार्यकर्त्यांना कुठलीही किंमत राहिलेली नाही. आमदार झाल्यानंतर रोहित पवार यांनी केलेल्या कुठल्याही मनमानी कारभार हा या कार्यकर्त्यांना दिसला नाही किंवा आ. राम शिंदे साहेब यांनी मंजूर केलेली कामे आत्तापर्यंत होत आहेत. याचे देखील या सर्व कार्यकर्त्यांनी भान ठेवावे. तुम्ही जर चुकीला चूक म्हणू शकत नसाल तर ही चमकोगिरी करून काय साध्य करणार आहात. आपल्याला किंमत यावी म्हणून हे तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आ.रोहित पवार यांच्या या मनमानी कारभाराचे समर्थन करून चमकोगिरी करण्याचं काम करत आहेत. परंतु जी शेतकऱ्यांची पिळवणूक भविष्यातली होणार आहे. या संदर्भात या चमकू कार्यकर्त्यांना कुठलीही काळजी नाही. तरी आ.प्रा.राम शिंदे यांनी जे निवेदन दिले आहे. याच्यावर सरकारने योग्य ती कार्यवाही करावी व अशा कारखानदारांवर किंवा अशा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे ही माव भारतीय जनता पार्टीच्या जामखेड तालुक्याच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.
अशी माहिती युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले यांनी
No comments:
Post a Comment