जामखेड प्रतिनिधी:१० ऑक्टोंबर
ग्रामिण भागातील मुलींना कलेच्या क्षेत्रात येण्यासाठी खुप धडपड करावी लागते. मात्र मुलिंना कलेच्या क्षेत्रात येऊन टीकायचे असेल तर शिक्षणाबरोबरच आई वडीलांचे संस्कार विसरु नका आसे मत प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी जामखेड या ठीकाणी व्यक्त केले.
दर वर्षी प्रमाणे याही वर्षी कोजागिरी पोर्णिमा उत्सवानिमित्त रविवार दि ९ रोजी सायंकाळी जामखेड येथिल महिलांसाठी नगरसेवक अमित चिंतामणी यांनी गरबा दांडियाचे आयोजन केले होते. यावर्षीचे कार्यक्रमाचे खास आकर्षण आसलेले "होणार सुन मी या घरची " मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान हीने या कार्यक्रमास हजेरी लावली होती. या कार्यक्रमास महीलांची प्रचंड गर्दी दिसून येत होती.
या वेळी नगरसेवक अमित चिंतामणी, ल ना होशिंग संस्थेचे उपाध्यक्ष अरुणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, संचालक राजेंद्र मोरे, आशोक शिंगवी, प्राचार्य श्रीकांत होशिंग, माजी नगराध्यक्षा सौ अर्चना सोमनाथ राळेभात, माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर, जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे, भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष पै शरद कार्ले, अॅड प्रविण सानप, माजी संचालक मनोज कुलकर्णी, आष्टी येथील जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, पत्रकार उत्तम बोडखे भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष मोहन (मामा) गडदे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे, युवा नेते बाजीराव गोपाळघरे, सचिन मासाळ, केदार रसाळ, प्रा अरुण वराट सर, डॉ अलताब शेख, प्रविण चोरडिया, भाजपा महिला अध्यक्षा सौ अर्चनाताई सपंत राळेभात, पांडुरंग उबाळे, शिवकुमार डोंगरे, संदिप सांगळे योगेश राऊत सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमा दरम्यान महीलांनी अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्याशी संवाद साधला यावेळी महीलांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की कलेच्या क्षेत्रात येऊन टीकायचे आसेल तर आधी शिक्षण पुर्ण करा त्या शिवाय ज्ञान वाढणार नाही आणि ज्ञान वाढले की कलेचे क्षेत्र सोपे जाते .मुलींवर देखील चांगले संस्कार आसले पाहीजेत.
नगरसेवक अमित चिंतामणी यांनी आयोजित केलेल्या आजच्या कोजागिरी सणाच्या कार्यक्रमा मध्ये मला संधी मिळाली हे माझे भाग्य समजते. समाजकारणाची ओढ आसलेले अमित चिंतामणी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना सांस्कृतिक श्रेत्र देखील टीकुन ठेवत आहेत ते आज आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामधुन दिसुन येत आहे. पुढे देखील आशीच साथ एक कार्य तत्पर आसलेले नगरसेवक अमित चिंतामणी यांना पुढील काळात तुम्ही द्या.
कलाकार म्हणून आम्ही भावना व्यक्त करतो. पण आम्हाला देखील दुख: आसते पण ते दुख: आम्ही साठवुन ठेवतो मात्र साठलेलं दुख: कुठेतरी जगताना आम्ही कॅमेरा समोर आणुन या दुखाला वाट मोकळी करतो. आई वडीलांचे संस्कार लक्षात ठेवेने व पुढे चालत जाणे तसेच कीती मोठं झाले तरी आपण माणुसकी विसरायचे नाही हे मला माझ्या आईवडिलांनी शिकवले आहे.
आदर्श स्थान म्हणून मी होणार सुन मी या घरची या मालिकेत सुनेचा अभिनय करते पण मला रोजच्या जीवनात सर्व महीला व मुलींना एक सांगायचं आहे की प्रत्येक सासुने सुनेला मुलगी समजुन पाहीले पाहीजे व प्रत्येक सुनेने सासुला आई म्हणून पाहीले पाहीजे तरच घरामध्ये सुख शांती व समाधान वाटेल. ज्या वेळी चुकाल त्यावेळी माफ करा पुन्हा चुक होणार नाहीत याची काळजी महीलांनी घेतली पाहिजे. जामखेड शहरातील महीलांचे गर्दी व इथली शिस्त पाहुन मला खुप भावले आहे आसे देखील त्यांनी म्हणत जामखेड शहरातील महीलांचे कैतुक केले.
यानंतर अहमदनगर येथील आकाश डान्स ग्रृप व जामखेड येथिल ॲपॅश्ट्रापी डान्स ॲकॉडमी यांना आपली नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार निलेश दिवटे यांनी केले.
No comments:
Post a Comment