जामखेड प्रतिनिधी :१० ऑक्टोंबर
जामखेड येथील तथागत बुध्द विहार येथे मबौद्ध पौर्णिमा व वर्षावास समारोपा निमित्त आ. रोहित पवार यांच्या हस्ते वंदना व खीर वाटप करण्यात आले आले.
जामखेड येथील महावितरण कंपनीचे कर्मचारी व बौद्धाचार्य बलभीम जावळे यांनी शहरातील बौध्दांना बौध्द संस्कार विधी करता यावेत व धम्माचे ज्ञान घेता यावे म्हणून स्वखर्चाने तपनेश्वर भागातील नागेश विद्यालयाच्या पाठीमागे तथागत बुध्द विहाराची स्थापना केली आहे. या ठिकाणी नुकताच वर्षावास समारोप कार्यक्रम संपन्न झाला. या निमित्त काल दि. ९ आॅक्टोबर रोजी पौर्णिमेनिमित्त कर्जत जामखेडचे कार्यकुशल आमदार आ.रोहित पवार यांच्या हस्ते बुध्द वंदना घेऊन तसेच खीरदान करण्यात आले. यावेळी यावेळी आ. रोहित पवार यांचे बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, माजी नगरसेवक अमित जाधव, युवक कार्यकर्ते समीर चंदन, सचिन शिंदे, बौद्धचर्य व पत्रकार संजय वारभोग, ताहेरखान पठाण, प्रवीण उगले, वसीम सय्यद (मंडप), लहू पवार, सुरज पवार, प्रमोद गायकवाड, मुकुंद डूचे, अभिमान खाडे, संदीप डोकडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच संध्याकाळी बौध्द बंधू भगिनींच्या उपस्थित झालेल्या बौध्द वंदना व खीर दान कार्यक्रम झाला. एकंदर सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शेवटी बौध्दाचार्य बलभीम यांनी सर्वांचे आभार मानले
No comments:
Post a Comment