खर्डा प्रतिनधी :९ ऑक्टोंबर
ईद-ए-मिलाद पैगंबर हजरत मोहम्मद (स) जयंती खर्डा शहरात मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दिनांक 9 ऑक्टोबर रोजी पूर्ण देशभरात ईद ए मिलाद ऊन नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, खर्डा शहरातून यावेळी भव्य अश्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक ऐक्य व सद् भावनेचे प्रतीक असणारा ईद-ए-मिलाद साठी हिंदू बांधवांनीही मुस्लिम बांधवांना यावेळी शुभेच्छा दिल्या.
मुस्लिम बांधवांनीही शुभेच्छा देताना म्हटले की,
तमन्ना आपकी सब पुरी हो जाए,
हो आपका मुकद्दर इतना रोशन की,
आपकी हर दुवा कबूल हो जाए !
आप और आपके परिवार को,
ईद-ए-मिलाद ऊन नबी मुबारक..
यावेळी खर्डा शहरातून सकाळी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली शहरातील लहान मुले हातात झेंडे फडकत आनंद व्यक्त करीत होते.या मिरवणुकीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मिरवणुकीने खर्डेकरांचे लक्ष वेधून घेतले होते, त्यानंतर मौलवींनी व्याख्यान सांगितले व कार्यक्रमाची सांगता यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल शेषराव मस्के, पोलीस कॉन्स्टेबल खाडे, पोलीस कॉन्स्टेबल मिसाळ, पोलीस कॉन्स्टेबल थोरात इ. चोख बंदोबस्त ठेवला होता.
No comments:
Post a Comment