खर्डा प्रतिनिधी :९
खर्डा गावातील सर्व जाती धर्माचे लोक गुन्या गोविंदाने राहतात ही अभिमानास्पद गोष्ट आहे. असे गौरवोद्गार समाजसेवक बाळासाहेब गायकवाड यांनी काढले.
संघर्ष फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तसेच
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे समाजसेवक बाळासाहेब गायकवाड यांनी ऐतिहासिक (शिवपट्टण) खर्डा नगरीस भेट दिली. यावेळी खर्डा ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब गायकवाड म्हणाले की, ऐतिहासिक खर्डा गांव संपुर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. या नगरीत मराठे शाहीच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा किल्ला आहे. तसेच सर्व जाती-धर्मांचे नागरिक गुण्या गोविंदाने व आनंदाने राहतात. याचा मला अभिमान आहे. संघर्ष फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही अनेक सामाजिक कार्यक्रम घेवुन महापुरुषांचे विचार तळागळात पोहचविण्याचे काम करित आहोत असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाप्रसंगी खर्डा नगरीतील भुमीपुञ ञिंबक स्वामी जंगम, पञकार रिजवान बागवान,जावेद बागवान, आसिफ बागवान, कलिम शेख, मोहिन बागवान, चाँद बागवान इ. पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा