जवळा प्रतिनिधी : २ आॅक्टोबर
आ.रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती येथील मित्रपरिवारातर्फे जामखेड तालुक्यातील विविध अशा १२ गावे व वाडीवस्तीवरील २० अंगणवाड्यांमधील ६६७ विद्यार्थांना दप्तर , पाणी बॉटलसह विविध शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
जामखेड तालुक्यातील मोहा, नाहुली, धामणगाव, तेलंगशी, जायभायवाडी, मोहरी, नागोबाचीवाडी, मुंगेवाडी, लोणी, पोतेवाडी चोबेवाडी, मुंजेवाडी, या गावांचा यात समावेश होता. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून बारामतीच्या मित्र परिवारातर्फे हा एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमसाठी संबंधित गावातील राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या साहित्याचे वाटप आजी माजी सैनिक व सेवा निवृत्त शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले.
No comments:
Post a Comment