खर्डा प्रतिनिधी : २ आॅक्टोबर
जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा येथे उद्या दि. ३ ऑक्टोबर रोजी कर्जत जामखेडचे कार्यकुशल आमदार आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच रावण दहनाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे तेथील संपूर्ण परिसर स्वच्छ करून घेतला जात आहे.
आ. रोहित पवार हे मतदारसंघात विविध पूर्व उपक्रम राबवत असतात गतवर्षी विजय दशमीच्या शुभमुहूर्तावर खर्डा येथे महाराष्ट्रातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज उभारण्याचा कार्यक्रम केला होता. त्याच पार्श्वभूमीवर या वर्षी देशातील सर्वात उंच रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची जोरदार तयारी सुरू असून कार्यक्रम स्थळी व परिसरातील ठिकठिकाणी स्वच्छता केली आहे, हा कार्यक्रम खर्डा किल्ल्याच्या परिसरात होत असून स्वच्छते बरोबरच विद्युत दिवेही लावले जात आहेत.
दसऱ्याला अनिष्ट चालीरीती आणि प्रवृत्तींना धारा न देण्यासाठी रावणाचे दहन करण्याची परंपरा आहे. आपल्या या संस्कृति आणि परंपरेला अनुसरूनच राज्यातील आजवरच्या सर्वात उंच रावणाची प्रकृतीचे दहन करण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असल्याचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे या कार्यक्रमासाठी खर्डा येथे युवराज संभाजी राजे, छत्रपती तसेच लोकप्रिय पौराणिक रामायण मालिकेतील राम, सीता, लक्ष्मण यांची भूमिका साकारलेले कलाकार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.
या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी कर्जत जामखेड तालुक्यातील नागरिकांनी
मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आ. रोहित पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे यासाठी कर्जत व जामखेड तालुक्यातील विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून बैठका घेऊन जनतेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येते आहे.
No comments:
Post a Comment