जामखेड प्रतिनिधी : २ आॅक्टोबर
जामखेड तालुक्यातील नान्नज जवळील राजेवाडी येथील अशोक मारुती कुमटकर (वय ३९ वर्षे) यांना कोणत्या तरी वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे.
यातील मयत हे त्यांची मोटरसायकल क्रमांक एम. एच. १६ बिडी २३४७ हिचे वरून राजेवाडीह ते नान्नज जात असताना अज्ञात वाहनावरील चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हायगयीने,अविचाराने ,रोडचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालून यातील मयत यांचे गाडीस धडक देऊन त्यांचे मृत्यूस कारणीभूत होऊन मयताचे गाडीचे नुकसान करून अपघाताची खबर न देता निघून गेला. यावरून फिर्यादी सुरज अशोक कुमटकर (वय १९ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज्ञात वाहनावरील चालक (नाव पत्ता माहित नाही) याचे विरूद्ध गु.र.नं. व कलम : 456/2022 भादवि कलम 304(अ), 279, 427, 337, 338 मोटर वाहन कायदा कलम 184,134(अ)(ब), 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
हा अपघात दि. १ आॅक्टोबर २०२२ रोजी रात्री ८ : ०० वाजेच्या सुमारास जामखेड करमाळा रोडवर नान्नज पोलीस दूरक्षेत्र समोर झाला आहे.
पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शिवाजी भोस हे करत आहेत.
No comments:
Post a Comment