जामखेड प्रतिनिधी २४ ऑक्टोबर
जामखेड तालुक्यातील खर्डा भागात पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून सिताराम गड खर्डा येथे आढाव बैठक आ. प्रा.राम शिंदे व जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या प्रमुख उपस्थित आढावा बैठक घेण्यात आली.शिंदे फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांच्या हीताचे आहे. पैसा शेतकऱ्यांचा आहे. विमाकंपण्यांनी शेतकऱ्यांना अटी घालून चालणार नाहीत त्यासाठी विमा कंपन्यांना शासनाकडून काही शेतकरी हिताच्या अटी घालून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार आसे मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
खर्डा परिसरासह, मोहरी, तेलंगशी, जायभायवाडी भागात सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे बांधावर जाऊन शेतातील उभ्या नुकसान पिकाचे पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी नंतर सिताराम गड येथे आढाव बैठक घेण्यात आली.
या आढावा बैठकीमध्ये माझी मंत्री आ प्रा राम शिंदे यांनी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना म्हटले आहे की सरसकट पंचमे करून स्टॅंडर्ड सूचना प्रशासनास द्याव्यात, रब्बीतील ज्वारी पेरणी होणार नसून शेती नापीक राहणार आहे त्याची पडताळणी करावी, लवकरच पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन मदत शेतकऱ्यांना द्यावी शेतकऱ्या संदर्भात काही प्रश्न पालकमंत्री यांच्यापुढे आढाव बैठकीत मांडले.
यावेळी आढावा बैठकीमध्ये उत्तर देताना महसूलमंत्री, दुग्ध व मत्स्यसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुढे बोलताना म्हणाले की ऑनलाईन पीक विम्यासाठी नोंदणी करताना अडचणीत असल्याने ऑफलाईन पंचनामे करण्याचे सूचना करण्यात आल्या, शेतकऱ्यांचा खाजगी विमा कंपन्या वर रोष आहे शेतकऱ्यांकडून पिक विमा साठी काही रक्कम भारत सरकार व राज्य सरकार भागीदारी करून भरत असते त्या पटीत शेतकऱ्यांना मदत मिळत नाही.
६५ मिली मीटर पावसाचे पाट असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीच्या फायदा मिळत नाही, त्या विषयावर त्या नियमात काय त्रुटी राहिल्या आहेत त्या शिथिल करण्याचा प्रयत्न चालू आहे. खाजगी विमा कंपनीचे ७२ तासाच्या आत विमा कंपनीचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कळवणे बंधनकारक ही आठ शिथिल करण्याची गरज आहे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे हा निर्णय बदलण्याचा प्रयत्न कृषी मंत्र्यांशी चर्चा करून रद्द करण्यासाठी प्रयत्न करू.
जामखेड तालुक्यात पंचनामाचा घोषवारा वाचताना जामखेड तालुका हे 30 टक्के पेक्षा जास्त नुकसान प्राथमिक अहवाल यावेळी त्यांनी वाचून दाखविला. १५२६९ हेक्टर क्षेत्र बाधित आहे, २५६८५ शेतकऱ्यांची संख्या आहे. पंचनामे झालेले क्षेत्र ९७७८.९५ हेक्टर, त्यात १६२४२ शेतकरी आहेत. शिल्लक पंचनामे ५४९०.०५ हे सरक्षित क्षेत्र असून शेतकऱ्यांची संख्या ९४४३ आहे .यावर्षी एचडीएफसी कंपनीचे 33 हजार आटशे हेक्टर, मागील वर्षी वीस हजार शेतकऱ्यांनी १२१७ हेक्टर सुरक्षित होते. ३८ हजार कोटी विमा होता. तर यावर्षी एचडीएफसी कंपनी शेतकऱ्या ंची तीस हजार हेक्टर विमा भरलेला असून १६०५६ हेक्टर हेक्टर साठी ४८ कोटी संरक्षित रक्कम आहे .सरसकट पंचमी करून सर्वांना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे व सर्व शेतकरी शासकीय मध्ये बसून वंचित राहता कामा नये अशा सूचना आढावा बैठकीत देण्यात आल्या. शेतकऱ्यांचा वीज प्रश्न लवकरच सुटून, मागेल त्याला शेततळे देण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्नशील राहू.
यावेळी प्रांत अधिकारी अजित थोरबोले, जामखेड तहसीलदार योगेश चंद्रे, कर्जत तहसीलदार नानासाहेब आगळे, ना. तहसीलदार परमेश्वर पाचारणे, ना. तहसीलदार मनोज भोसेकर,जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप ,तालुका कृषी अध्यक्ष रामचंद्र सुपेकर, कृषी पर्यवेक्षक सुरेश कटके ,जिल्हा परिषद पशुसंवर्धन उपायुक्त डॉ केशव तुंबारे,तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ संजय राठोड, पशुधन विकास अधिकारी डॉ कुलदीप चौरे, सहाय्यक गटविकास अधिकारी दयानंद पवार, तालुका विकास अधिकारी बापूसाहेब माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील बोराडे, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, तालुका कृषी अधिकारी अशोक शेळके, ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, कामगार तलाठी श्रीराम कुलकर्णी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, मकरंद काशीद, डॉ सोपान गोपाळघरे ,कर्जत जामखेड विधानसभा भाजपा अध्यक्ष रवींद्र सुरवसे, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, माजी पंचायत समिती सदस्य भगवानराव मुरुमकर ,माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, संदेश कार्ले, सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे, महेश दिंडोरे ,वैजनाथ पाटील, मदन पाटील, राजू मोरे, डॉ सोपान गोपाळघरे यांच्यासह विविध खात्यातील पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment