जामखेड प्रतिनिधी : २४ आॅक्टोबर
जामखेड शहरालगत असलेल्या धोत्री शिवारात काँटन जिनीग मिलच्या गेटसमोर आज दि. २४ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या पुर्वी कुणीतरी अज्ञात इसमाने गणेश शिवाजी वारे (वय ३०) या तरूणाचा निर्घृण खून केल्याचे घटना घडली असून यामुळे जामखेड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनेतील मयत तरूण गणेश शिवाजी वारे चे वडील शिवाजी मारुती वारे (वय- ५२) रा. संगमजळगाव ता. गेवराई, जि. बीड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझा मुलगा गणेश शिवाजी वारे (वय ३०)% यास कोणीतरी अज्ञात ईसमाने कोणत्यातरी कारणावरुन त्याच्या पोटावर, पाठीवर, छातीवर, डोक्यावर, हातावर व पायावर काहीतरी टनक हत्याराने जबर मारहाण करुन जिवे ठार मारले. आहे म्हणुन त्या अज्ञात फिर्यादिवरुन गुन्हा रजिस्टर नंबर 485/2022 नुसार भा.द.वि. कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंडलिक आवचरे यांनी दुपारी सदर मृतदेहाचे शवविच्छेदन केल्या नंतर सदरचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत गणेश शिवाजी वारे याचे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील संगम जळगाव हे मुळ गाव आहे. मात्र गेल्या पाच वर्षांपासून तो बाहेच फीरत होता. गेल्या पाच वर्षांत त्याचा घरच्यांशी संपर्क नव्हता.
तो जामखेड कडे का व कशासाठी आला तसेच त्याला कोणी व कोणत्या कारणाने मारले याची उद्याप माहीती मिळु शकेलेली नाही.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातखडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात, अनिल भारती या अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या.
या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे हे करत आहेत.
No comments:
Post a Comment