जामखेड प्रतिनिधी : २३ आॅक्टोबर
जामखेड येथे मागील जुन्या वादाच्या कारणावरुन हाॅटेल मध्ये पार्सल आणण्यासाठी गेलेले कलाकेंद्र चालक धिरज अनिता पवार यांना करण चव्हाण सह ६ जणांनी लोखंडी राॅड, दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर जामखेड शहरातील कान्होपाञा नगर येथे राहणारे व कलाकेंद्र चालक धिरज अनिता पवार वय-२६ वर्षे हे जामखेड बीड रोडवरील हाॅटेल न्यू कावेरी येथे जेवनाचे पार्सल घेण्यासाठी आलेले असताना यातील आरोपी करण चव्हाण (पुर्ण नाव माहीत नाही) व शुभम सांळुखे (पुर्ण नाव माहीत नाही ) यांनी मोटारासायकल वर येउन करण चव्हाण याने त्याचे हातातील लोंखडी राँड फिर्यादीचे डोक्यात मारुन गंभीर दुखापत केली आहे व शुभम सांळुखे याने जमिनीवरील पडलेले दगड हातात धरुन यातील फिर्यादि धिरज अनिता पवार यांच्या पाठीवर व उजवे हाताचे बोटावर मारुन जखमी केले आहे आहे व यातील आरोपी अनिकेत चव्हाण (पुर्ण नाव माहीत नाही ) व ईतर 3 अनोळखी ईसम यांनी मोटारसायकलवर येउन लाथाबुक्यांनी मारहाण करुन घाणघाण शिवीगाळ केली आहे व आरोपी क्र 1 याने फिर्यादीस परत जर नादी लागला तर कायमचा काटा काढु अशी धमकी दिली आहे . याबाबत धिरज अनिता पवार यांनी
दिलेल्या फिर्यादिवरुन गुन्हा रजी. 483/2022 भा.द.वि. कलम 326,324, 323, 143,147,148,149,504,506, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी धिरज अनिता पवार हे जखमी झालेने ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करण्यात आले.
घटना जामखेड येथील न्यु कावेरी हाँटेल समोर बीड रोड जामखेड येथे दि.22/10/2022 रोजी राञी 21/00 वा चे सुमारास घडली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे हे करत आहेत.
No comments:
Post a Comment