जामखेड प्रतिनिधी : २२ आॅक्टोबर
महाराष्ट शासनाच्या अन्न व नागरी पुरावठा विभागामार्फत अन्नासुरक्षा योजनेमधील आणी अंत्योदय योजनेमधील लाभार्थी यांना दिवाळीनिमित्त ,"आनंदाचा शिधा" वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळी शिधा वाटप आज मौजे चौंडी येथील स्वस्त धान्य दुकानातून आ. प्रा. राम शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी लाभधारक उपस्थित होते.
त्यांतर्गत प्रत्येक कुटुंबाला १ किलो रवा, १ किलो साखर, १ किलो हरबरा डाळ, १ किलो पामतेल असे किट १०० रुपयात वाटप करण्यात येणार आहे.जामखेड तालुक्यात अन्नासुरक्षा योजनेतील २५४४६ कार्ड धारक आणी अंत्योदय योजनेतील ५५५६ कार्ड धारक असे एकूण ३१००२ कार्ड धारक असून त्यांतर्गत एकूण १७८२०० लाभार्थी यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जामखेड तालुक्याला सर्व दिवाळी शिधा संच प्राप्त झाले असून आजपासून स्वस्त धान्य दुकानामधून वाटप करण्यास सुरवात झाली आहे.
"आनंदाचा शिधा' कीटच्या माध्यमातून गरिबांना १०० रूपयांत प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चणाडाळ व
पामतेल वाटप केले जाणार आहे. जामखेड तालुक्यात एकूण १०३ दुकाने असून नियोजनपूर्वक आराखडा तयार करून २ दिवसात हे वाटप पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यातील सर्व लाभार्थी यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे व प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
शासनाकडून दिवाळीसाठी गोरगरीब लोकांसाठी दिलेल्या दिवाळी शिधाबाबत लाभार्थी यांनी समाधान व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा