खर्डा प्रतिनिधी :२६ नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील नायगाव येथे विविध उपक्रम राबवून संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच शिवाजी ससाने यांनी संविधाना विषयी मार्गदर्शन केले व विचार मांडले. तसेच जिल्हा परिषद शाळा नायगाव, पंचक्रोशी विद्यालय, उगले वस्ती शाळा यांच्यावतीने सविधान वाचन करून तसेच वेगवेगळे उपक्रम राबवून संविधान दिन साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा नायगाव येथे "मी ज्ञानी होणार" अशी परीक्षा घेण्यात आली. त्याच्यामध्ये तीन नंबर काढण्यात आले. विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. उगले वस्ती शाळेमध्ये पाढे वाचन करून तसेच पंचक्रोशी विद्यालय येथे विद्यार्थ्यांनी संविधानाविषयी भाषणे घेण्यात आली. त्या ठिकाणी नायगावचे सरपंच चंदू उगले, चेअरमन आश्रु उगले, माजी सरपंच शिवाजी ससाने, विनोद उगले, चंद्रकांत गायकवाड, पोलीस पाटील बाबासाहेब उगले, युवराज गायकवाड, ईश्वर ससाने, नंदकुमार उगले, तसेच मुख्याध्यापक साळवे सर, कोरे सर, बोराटे सर, नांगरे सर, बोंडगे सर, घोडके सर, फुंदे सर, शेकडे मॅडम, लव्हाळे सर, राजगड सर, कोल्हे सर, पटेकर मॅडम, नीलम उगलेंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment