जामखेड प्रतिनिधी : १८ नोव्हेंबर
ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी व धर्मासाठी आपले जीवन समर्पित केले त्यांच्याबद्दल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अपशब्द वापरले त्यांचा वक्तव्याचा भाजपा युवा मोर्चा च्या वतीने खर्डा चौक येथे जोडे मारो आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आला.
आज दि. १८ नोव्हेंबर रोजी भाजपा युवा मोर्चा जामखेड तालुका शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या या अंदोलनासाठी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, तालुका उपाध्यक्ष मोहन मामा गडदे ज्ञानेश्वर अंदुरे, जिल्हा चिटणीस उदय पवार, गोरक घनवट, शिवकुमार डोंगरे, शिवकुमार गुगळे, डॉ. महेश मासाळ, अजय सातव, अर्जुन म्हेत्रे, मोहन देवकाते, ऋषिकेश मोरे, पांडूरंग मोरे, लक्ष्मण वाघमोडे, मनोज गडदे, बारीकराव हुलगुंडे, तुषार बोथरा, आण्णा ढवळे, जयदिप मडके, सावता जाधव, वैभव कार्ले, प्रवीण कार्ले, अंगद कार्ले, नितीन धनवटे, संजय वाघमोडे, चंदू कार्लेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आपले तिव्र भावना व्यक्त करत निषेधाच्याही घोषणा दिल्या.
No comments:
Post a Comment