खर्डा प्रतिनिधी : १७ नोव्हेंबर
श्री छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाचे श्री संत गजानन महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व अहमदनगर जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अंतर महाविद्यालयीन जिल्हास्तरीय योग स्पर्धेचे आयोजन करण्यात
आले होते. या स्पर्धेत मुलांच्या गटात संगमनेर महाविद्यालयाचा संघ प्रथम विजेता ठरला. या संघातील वैष्णव कोरडे (प्रथम) विष्णू चक्रवर्ती (द्वितीय) देवांश सोळंकी (तृतीय) तर मुलींच्या गटात संगमनेर येथील ग्लोबल इन्स्टिट्यूट ची विद्यार्थिनी प्रगती देशमुख हिने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक अहमदनगर येथील न्यू आर्ट्स कॉलेजची कु. गौरी गौड हिचा आला तर तृतीय क्रमांक अहमदनगरच्या न्यू लॉ. कॉलेजची अक्षदा गुंड हिने पटकावला.
या जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन खर्डा गावच्या सरपंच सौ. नमिता आसाराम गोपाळघरे यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सात महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी सहभागी संघांना शुभेच्छा देत योगाचे महत्त्व विशद केले. या स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा क्रीडा विभागाचे सहसचिव डॉ. राजेंद्र देवकाते हे यावेळी उपस्थित होते. पंच म्हणून अहमदनगर येथील राष्ट्रीय पंच श्री उमेश झोटिंग संगमनेर येथील निसर्गोपचार तज्ञ व राष्ट्रीय पंच सुनील पथवे ध्रुव अकॅडमीचे श्री मंगेश खोपकर यांनी काम पाहिले.
या स्पर्धेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. राजू म्हेत्रे यांनी, सूत्रसंचालन प्राध्यापक मोहसीन शेख
यांनी केले व आभार प्रा. डॉ. शिवानंद जाधव यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा