जामखेड प्रतिनिधी : २० नोव्हेंबर
उस्मानाबाद जिल्हा भुम तालुक्यातील ज्योतिबाची वाडी येथील शेतकरी अमृता भगत (वय ४७) यांचा महिंद्रा बोलेरो कंपनीचे पांढरे रंगाचे पिकअप क्रमांक M H -25- P 3206 हा कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला असून ते चोरटे तो पिकअप घेऊन
जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील जामखेड ते सौताडा रोडने गेल्याचे माहिती मिळाली त्यानुसार त्या पिकअपचा पाठलाग करून पिकअप व २ आरोपी यांना जेरबंद करण्याची धडाकेबाज कामगिरी जामखेड पोलीसांनी केली आहे.
या बाबत सविस्तर असे की उस्मानाबाद जिल्हा भूम तालुक्यातील ज्योतिबाचीवाडी येथील शेतकरी भीमा अमृता भगत (वय ४७) यांचा महिंद्रा बोलेरो कंपनीचा पांढरे रंगाचा पिकअप क्रमांक M H -25- P 3206 अज्ञात चोरट्याने दि. १७ नोव्हेंबर २०२२
रोजीचे रात्री १०:०० ते दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ रोजीचे सकाळी ६:०० वाजताचे दरम्यान फिर्यादीचे राहते घरासमोरून चोरून नेला आहे. अशी माहिती काल दि. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत सायंकाळचे सुमारास वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक भोसले यांनी जामखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे यांना फोनवर कळविले की, वरील वर्णनाचे चोरी झालेले पिकअप जामखेडच्या दिशेने आलेले आहे तरी तुम्ही आपले हद्दीत त्याचा शोध घ्यावा अशी माहिती दिल्याने सपोनि सुनिल बडे सो.यांनी पेट्रोलिंग करणारे पोलीस अंमलदार पोलीस नाईक अविनाश ढेरे ,पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार कोळी, आबासाहेब आवारे यांना तात्काळ ही माहिती दिली. या माहितीवरून जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील जामखेड ते सौताडा रोडने पिकअपचा पाठलाग करून साकत फाटा, जामखेड येथे गाडी आडवी लावुन पिकअप व २ आरोपीं चोरट्याना जागेवर पकडले. त्यांना पोलीस स्टेशन येथे आणले असता, सदर आरोपीना त्यांचे नावे अतुल विक्रम वाघमारे रा.शिवाजीनगर, जि.बीड व आसाफ दस्तगीर शेख रा.रोहतवाडी, ता.पाटोदा जि.बीड अशी सांगितली आहेत.
अधिक सखोल चौकशी केली असता हे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार आरोपी अतुल विक्रम वाघमारे रा.शिवाजीनगर,बीड जि.बीड यांचेवर भादवि कलम 379 (गेवराई पो.स्टे), भादवि कलम 394, (शिवाजीनगर,बीड पो.स्टे), भादवि कलम 395 (नगर तालुका पो.स्टे), भादवि कलम 394 (श्रीगोंदा पो.स्टे.), भादवि कलम 392 (शिरूर पो.स्टे.जि.बीड), दोन वेळा, भादवि कलम 395 (सातारा), भादवि कलम 395, (कोतवाली पो.स्टे.), भादवि कलम 379 (पाटेादा पो.स्टे), भादवि कलम 395 (सातारा), भादवि कलम 379 (फलटन), भादवि कलम 394 (गातेगाव पो.स्टे.लातुर), तर आसाफ दस्तगीर शेख रा.रोहतवाडी ,ता.पाटोदा जि.बीड याचेवर भादवि कलम 379 (वैराग पो.स्टे.पंढरपुर), भादवि कलम 379( फलटन ,सातारा),
भादवि कलम 379 (शिवाजीनगर ,बीड), भादवि कलम 394 (गातेगाव ,लातुर), भादवि कलम 394 (पाथर्डी पो.स्टे.), भादवि कलम 379 (बीड तालुका पो.स्टे.), भादवि कलम 399 (शिवाजीनगर,बीड), असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
काल दि. १९ रोजी केलेली कामगिरी ही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पोलीस नाईकअविनाश ढेरे, पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार कोळी, आबासाहेब आवारे, प्रकाश जाधव यांनी केली असुन आरोपी व वाहन हे पुढील कार्यवाहीकरीता वाशी पोलीस स्टेशनचे पोना.भोसले व पोकॉ.शेवाळे यांचे ताब्यात दिले आहे.
No comments:
Post a Comment