प्रतिनिधी : १८ नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील बावी येथे उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आधार शिबिर घेण्यात आले.
शुक्रवार आज दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० या वेळेत पार पडले. बावी येथील या आधार शिबीरात गणेश हजारे, जगन्नाथ हंबीरराव, सुहास पवार, सारिका साळवे यांनी १३० नागरिकांच्या आधारकार्डला मोबाईल क्रमांक जोडले.
यावेळी पोस्टमास्तर बळी जायभाय, डाक आवेक्षक बापूराव पंडित व सुनिल धस यांचे नियोजन तर डाक विभागातील लालासाहेब पवार, छगन ढवळे, गणेश जगताप, धनराज भोसले, शामसुंदर महामुनी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
आपले बँकींग व इतर आॅनलाईन व्यवहार सुरळीत करण्यासाठी आधारकार्डला मोबाईल क्रमांक जोडण्यासाठी (लिंक) नागरीकांनी आपल्या जवळील डाक कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख यांनी केले.
No comments:
Post a Comment