खर्डा प्रतिनिधी - २५ नोव्हेंबर
जागतिक वारसा सप्ताहाचे औचित्य साधून दिनांक २५ नोव्हेंबर रोजी खर्डा येथील शिवपट्टण किल्ल्यावर दुर्ग स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेत श्री संत गजानन महाविद्यालय खर्डा, श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय खर्डा, १७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी जामखेड महाविद्यालय जामखेड, ल.ना हाऊसिंग विद्यालय जामखेड व ॲड. बि.डी. हंबर्डे महाविद्यालय आष्टी येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम', च्या जयघोषात विद्यार्थ्यांनी खर्डा किल्ल्यावरील प्लास्टिक कचरा झाडेझुडपे यांचे साम्राज्य संपुष्टात आणले. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभाग नाशिक कार्यालयाने या स्वच्छता मोहिमेसाठी मार्गदर्शन केले. या किल्ल्याविषयी माहिती देताना प्रा. धनंजय जवळेकर यांनी पुरातन वस्तू या आपल्या सांस्कृतिक संचित आहेत त्यामुळे हा सांस्कृतिक वारसा जतन करणे व त्यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य ठरते. असे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. या उपक्रमात खर्डा गावचे सरपंच श्री आसाराम गोपाळघरे यांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन प्राध्यापक व शिक्षक यांनीही श्रमदान केले. जामखेड येथील कॅप्टन प्रा. गौतम केळकर, मयूर भोसले, आष्टी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रवी सातभाई, प्रा. डॉ. सखाराम वांढरे तसेच श्री संत गजानन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद जाधव, प्रा. राजू म्हेत्रे, प्रा. शेख मोहसीन, प्रा. धनंजय जवळेकर प्रा. भरत मेंगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment