जामखेड प्रतिनिधी : २७ नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील जवळा येथे लुडो गेमच्या आधारे झुगार खेळत असल्याच्या माहितीवरून पोलीस पथकाने मारलेल्या छाप्यात काहीही हाती न लागल्याने ११२ क्रमांकावर फोन करून माहिती देणाऱ्याने जुगारीची मुद्दाम व खोडसाळपणे माहिती दिली असल्याचे समोर आले असून अशी माहिती देणारा जवळा येथील स्वप्निल दत्तात्रय हजारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की,जामखेड पोलास स्टेशनचे पोलीस काॅन्स्टेबल सचिन चंद्रकांत देवढे हे काल दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी आपली ड्युटी करत असताना दुपारी ३:०० वाजताच ११२ नंबर सेवेच्या काॅलवर फोन आला की जवळा गावात, जवळा बस स्टॅण्डचे बाजुला वेल्डींग शॉप जवळ काही लोक लुडो या गेमच्या आधारे जुगार खेळत आहेत. अशी माहीती मिळाल्याने त्याबाबत वरिष्ठांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार शिवाजी भोस, पोलीस कॉन्स्टेबल सतिष दळवी, यांचेसह तात्काळ पोलीस पथकासह सायंकाळी ५:०० वाजताचे सुमारास जवळा बस स्टँण्डचे बाजुला असलेल्या बेल्डींग • शॉप येथे जावुन सदर वातमीची खात्री केली असता तेथे कोणत्याही प्रकारचा जुगार किंवा लुडो गेम कोणीही खेळत नसल्याचे दिसले. त्यानंतर पोलीसांनी स्वप्नील हजारे मो. 7887410404 रा. जवळा ता. जामखेड यास फोन करुन त्याची समक्ष भेट घेतली असता त्याने मी मुद्दाम जाणुन बुजुण 112 ला कॉल केल्याचे सांगितले. तसेच सफाँ / भोस यांनी वेल्डींग दुकाण मालकाकडे तसेच इतर लोकांकडे विचारपुस केली असता त्यांनी कळविले की, थोड्या वेळा पुर्वी गावातील काही नागरीक हे शेती विषयक अँप मध्ये शेती विषयक माहिती बघत होते तसेच कुठल्याही प्रकारचे जुगार खेळत नसल्याचे कळविले आहे. त्यावरुन पोलीसांची खात्री झाली की, जवळा बस स्टँण्ड जवळ वेल्डींग शॉप येथे जुगार खेळणेबाबतचा कोणताही प्रकार घडलेला नाही. तसेच कॉलर याने 112 वर दिलेल्या माहितीच्या अनुशंगाने नमुद ठिकाणी पोलीस स्टाफसह जावून शहानिशा केली असता ती खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
स्वप्निल दत्तात्रय हजारे (वय 33) वर्ष धंदा ड्रायव्हर याने 112 वर कॉल करुन तो देत असलेली माहिती ही खोटी आहे. याची त्याला पुर्ण माहिती असताना देखील त्याने 112 वर कॉल करुन खोटी माहिती दिली म्हणुन जामखेड पोलास स्टेशनचे पोलीस काॅन्स्टेबल सचिन चंद्रकांत देवढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्वप्निल दत्तात्रय हजारे वय 33 वर्ष धंदा ड्रायव्हर याचे विरुध्द भा.द.वि. कलम 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भोस,व पोलीस नाईक अजय साठे हे करत आहेत.
No comments:
Post a Comment