जामखेड प्रतिनिधी : २७ नोव्हेंबर
महाराष्ट्रात बंदी असलेल्या गोवंशीय जातीच्या जनावरांचे तब्बल १२ लाख रुपये किमतीचे ८००० किलो गोमांस जामखेड येथून बाहेरगावी घेऊन जाणाऱ्या दोन आयशर टेम्पो पकडून या संबंधीत असलेल्या विविध ठिकाणच्या नऊ आरोपींवर कारवाई करत गोमांस व दोन टेपो असा तब्बल ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सर्व आरोपींवर भादवि कलम 269, 34 महाराष्ट्र पशु संरक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 चे कलम 5 (क) 9(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येत आहे.
सविस्तर असे की, जामखेड येथिल अहमदनगर जामखेड रोडवर, हॉटेल देशी तडका जवळ, दि २६ नोव्हेंबर रोजी रात्री १०:५४ वाजताचे सुमारास या गुन्ह्यातील आरोपी आरोपी क्रमांक १ ते ७ हे आरोपी महाराष्ट्र राज्यात गोवंश जनावरांची कत्तल करण्याची मनाई असलेल्या गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून आणलेले गोमांस त्यांचा मालक आरोपी क्रमांक 8) याचे सांगणेवरून आरोपी क्रमांक 9) याला जामखेड येथे पोहच करण्याकरीता वाहतुक करताना मिळून आले आहेत.
त्यानुसार यातील फिर्यादी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरचे पोलीस हेडकॉन्टेबल संदिप कचरु पवार यांचे फिर्यादीवरून
१)मुक्तार अब्दुल करीम शेख वय 50 वर्षे रा. वार्ड नंबर 2 कुरेशी मोहल्ला मक्का मज्जीत शेजारी श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर. २) अलतमश फैय्याज चौधरी वय 24 वर्षे रा. नालबंद खुंट, करशेटजी रोड, ता. जि. अहमदनगर,३) महेशकुमार जगदेव लोध वय 27 वर्षे मु.रा. शंकरपुरमुका ता. रिसीया, जि.बहरुच, राज्य उत्तरप्रदेश, ह.रा. चांदणीचौक झोपडपट्टी, ता. जि. अहमदनगर,
४) श्रीराज अहमद कल्लु अन्सारी वय 28 वर्षे मु. रा. शंकरपुरमुका ता. रिसीया, जि.बहरूच, राज्य उत्तरप्रदेश,
ह.रा. चांदणीचौक झोपडपट्टी, ता. जि. अहमदनगर
५) सभी अहमद मुशरफ खान वय 28 वर्षे मु.रा. शंकरपुरमुका ता. रिसीया, जि.बहरुच, राज्य उत्तरप्रदेश, ह.रा. चांदणीचौक झोपडपट्टी, ता. जि. अहमदनगर
६) सादिक सत्तार कुरेशी वय 38 वर्षे रा.खड़ रोड जामखेड, ता. जामखेड, जि. अहमदनगर
७) आयशर ट्रक आर. टी. ओ. पासिंग क्रमांक एम. एच. 12 एफ. सी. 6359 वरील वाहन चालक अनोळखी इसम (फरार)
८) नामे तौफीक कुरेशी (फरार) पुर्ण नाव माहित नाही.
रा. अहमदनगर याचे सांगणेवरून
९) शेख अझहर अय्युब वय 29 वर्षे रा. खडकत, ता. आष्टी जि.बीड यांचे विरुध्द भादवि कलम 269,34 महाराष्ट्र पशु संरक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 चे कलम 5 (क) 9(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पुढील तपास पोलीस अधीक्षक राकेशकुमार ओला व
जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ 103 एस डी लोखंडे हे करत आहेत.
जप्त केलेला मुद्देमाल खालील प्रमाणे
ताब्यात घेतलेल्या आरोपींचे कब्जात 8,000 किलो गोमास, अर्धवट कापलेली गोवंशीय जनावरे, वाहतुकीसाठी वापरलेला दोन आयशर टेम्पो व एक हुंडाई कंपनीची क्रेटा कार असा एकुण 34,00,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर बाबत पोहेकॉ/440 संदीप कचरु पवार ने. स्थागुशा अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन जामखेड पोलीस स्टेशन 555/2022 भादविक 269, 34 सह महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम कलम 5 (क), 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील कारवाई जामखेड पोस्टे करीत आहे.
आरोपी नामे मुक्तार शेख हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल आहेत त्यांची माहिती खालील प्रमाणे-
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. संगमनेर शहर 38/2015 म.प्रा.सं.का.क. 5 (ब) (क), 9 (अ) (ब) व 11
2. संगमनेर शहर 69/2018 म.प्रा.सं.का.क. 5 (अ), 9 (क)
3. जामखेड 555/2022 भादविक 269, 34 सह म.प्रा.सं.का.क. 5 (क), 9 (अ)
आरोपी नामे अल्तमश चौधरी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल आहेत. त्यांची माहिती खालील प्रमाणे-
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. भिंगार कॅम्प 25/2015 म.प्रा.सं.का.क. 5 (अ) (1), (2), 9
2. जामखेड 555/2022 भादविक 269, 34 सह म.प्रा.सं.का.क. 5 (क), 9 (अ)
आरोपी नामे तौफिक युनूस कुरेशी (फरार) हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात चार गुन्हे दाखल आहेत. त्यांची माहिती खालील प्रमाणे-
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. तोफखाना 10/2018 म.प्रा.सं.का.क. 5 (क), 9 (अ) व प्रा.क्रु.वा.सं.क. 11
2. कोतवाली 130/2018 भादविक 269, 34 सह प्रा.सं. 5 (के), 9 (अ)
नगर तालुका 811/2022 भादविक 269, 34 सह म.प्रा.सं.का.क. 5 (क), 9 (अ)
3. जामखेड 555/2022 भादविक 269, 34 सह म.प्रा.सं.का.क. 5 (क), 9 (अ)
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. आण्णासाहेब जाधव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
No comments:
Post a Comment