जामखेड प्रतिनिधी : २८ नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील मोटारसायकलस्वार गोविंदा भीमराव कराड (वय १८) याचा जागीच मृत्यू झाला आहे. जामखेड पासून ५ किलोमीटर अंतरावर खर्डा रस्त्यावर गोविंदा कराड हा झाडे झुडपात रस्त्याच्या कडेला मोटरसायकल सह पडलेला आढळला.
सविस्तर असे की, आज सोमवारी दि. २८ रोजी जामखेड पासून पाच किलोमीटर अंतरावर खर्डा रस्त्यावर गोविंदा कराड हा झाडे झुडपात रस्त्याच्या कडेला मोटरसायकल सह पडलेला आढळला. तो आपल्या चुलत्याकडे पुण्याला ऊस तोडणी साठी गेला होता. परंतु काल गावाकडे येत असताना त्याचा मोटरसायकल (क्रमांक एम एच १६ ए एक्स ९२९०) वरून जात असताना अपघात झाला.
याबाबत आ. रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक विनय डुकरे यांनी सकाळी ६:०० वाजेच्या सुमारास यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दूरध्वनी द्वारे माहिती दिल्यानुसार कोठारी यांनी तातडीने आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धाव घेतली.यानंतर अपघातग्रस्त युवकास जामखेड ग्रामीण रुग्णालयामध्ये आणल्यानंतर एक तास रूग्णवाहिकेतच ठेवण्याची वेळ आली. कारण ग्रामीण रुग्णालयामध्ये रूग्ण तसेच मृतदेह उतरायला कर्मचारीच नसल्याची बाब समोर आली. पर्यायाने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनीच पुढाकार घेऊन नातेवाईकांच्या सहकार्याने मृतदेह शवविश्छेदन खोली पर्यंत घेऊन गेले.
सदर घटनेची जामखेड पोलिसांना खबर अर्जुन कराड यांनी दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ युवराज खराडे यांनी त्यास मृत घोषित करून शवविश्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला. यावेळी विनय डुकरे, आकाश सानप, मोहित मिसाळ, बिभीषण सांगळे यांनी मदत केली
चौकट
जामखेड ग्रामीण रुग्णालयामध्ये कर्मचारी नसल्यामुळे मला स्वतःलाच ५०० फूट मृतदेह स्ट्रेचर वर टाकून इतरांच्या मदतीने शवविश्छेदन खोलीपर्यंत मध्ये टाकावा लागला.
संजय कोठारी
सामाजिक कार्यकर्ते
No comments:
Post a Comment