जामखेड तालुक्यात राजकीय भूकंप ,राष्ट्रवादीला मोठे खिंडार.. आ.प्रा. राम शिंदें यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादीच्या २०० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

Home ठळक बातम्या राजकीय जामखेड तालुक्यात राजकीय भूकंप ,राष्ट्रवादीला मोठे खिंडार.. आ.प्रा. राम शिंदें यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादीच्या २०० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

जामखेड तालुक्यात राजकीय भूकंप ,राष्ट्रवादीला मोठे खिंडार.. आ.प्रा. राम शिंदें यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादीच्या २०० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

सोमवार, नोव्हेंबर २१, २०२२ ठळक बातम्या, राजकीय,

जामखेड प्रतिनधी:२१ नोव्हेंबर

जामखेड तालुक्यातील राजुरी, डोळेवाडी,एकबुर्जीवस्ती , घुलेवस्ती, बांगरवस्ती आणि खर्डा परीसरातीलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या २०० कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला
 रविवारी दिनांक २० रोजी चोंडी येथे आमदार प्रा. राम शिंदे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात जाहिर प्रवेश केला आहे.
 जामखेड तालुक्यात अचानक राजकीय भूकंप झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या राजकीय भुकंपामुळे राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. जामखेड तालुक्यात  आलेल्या राजकीय भूकंपाचे केंद्रबिंदू राजुरी हे गाव ठरले. राजुरीला राष्ट्रवादीचा मजबुुत बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. मात्र या बालेकिल्ल्याला मोठे भगदाड पडले आहे. राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोठा राजकीय भूकंप झाला. राजुरी गावातील बडे राजकीय प्रस्थ माजी सरपंच सुभाष  काळदाते यांनी आपल्या २०० समर्थकांसह भाजपात जाहीर प्रवेश करत जामखेड तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. हे सर्व जण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. 

भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रा. राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार राम शिंदे यांनी माजी सरपंच सुभाष  काळदाते यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे भाजपात स्वागत केले. यावेळी आमदार राम शिंदे यांनी राजुरीकरांशी  संवाद साधला. ग्रामपंचायत निवडणुकीत आपला पॅनल बहुमताने निवडून आणा, तुमच्या पाठीशी सर्व ताकद लावू, गावाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे, असा शब्द यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांनी दिला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष आजीनाथ हजारे , भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, पांडुरंग उबाळे, प्रविण चोरडिया, डाॅ अल्ताफ शेख, प्रसिद्धी प्रमुख आप्पासाहेब ढगे यांच्यासह पदाधिकारी  उपस्थित होते. 

रविवारी दिनांक २० रोजी चोंडीत पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात राजुरीचे माजी सरपंच सुभाष काळदाते, राष्ट्रवादीचे युवा नेते संभाजी कोल्हे, माजी ग्रामपंचायत सदस्य नाना काळदाते, साहेबराव काळदाते, शिवदास कोल्हे, माजी उपसरपंच सुरेश खाडे, सोसायटी संचालक बाळासाहेब मोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल काळदाते, जयराम काळदाते, रमेश काळदाते, रघुनाथ फुंदे, विक्रम काळदाते, राहुल खाडे, अक्षय काळदाते, आप्पा राऊत, गणेश काळदाते, पप्पू गायकवाड, अशोक काळदाते, सागर फुंदे, राहुल पुलावळे,राम काळदाते, राजु पवार, गोकुळ अवताडे, गोटू लटपटे, नितीन मोरे, सागर काळदाते, किरण घुले, वैजीनाथ डोळे, भरत डोळे, नासीर शेख, अक्षय सपकाळ, सोनू साळवे, विशाल शिंदे, राहूल काळदाते, गणेश काळदाते, आमित राऊत, सुधीर राऊत, अजय कोल्हे, विकास कोल्हे, लाला काळदाते, अनिरुद्ध सपकाळ, आबा सदाफुले, किशोर सदाफुले, सुधीर सदाफुले, साईनाथ मोरे, अविनाश रेडे, गणेश औताडे, शंकेश्वर कोल्हे, रघुनाथ काळदाते, अनिकेत काळदाते, अभिजित काळदाते, राम काळदाते, पोपट लटपटे, प्रदिप लटपटे, समाधान गायकवाड, शंकर डोळे, दादा खाडे, महेश खाडे, सर्जेराव घुले, रवि काळदाते, रमेश खाडे, किरण घुले, राजू मोरे, अंकुश खाडे, सुदाम जाधव, बाप्पू मोरे, विक्रम काळदाते, शहाजी पिसाळ, गणेश कोल्हे, महादेव गिरी, बापूसाहेब काळदाते, अशोक कोल्हे, आप्पा चव्हाण, सागर चव्हाण, विशाल चव्हाण, जयराम काळदाते, सुधीर कोल्हे, श्रीराम काळदाते, युवराज काळदाते, अक्षय सपकाळ यांच्यासह २०० कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

     राष्ट्रवादीमधून भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 
राष्ट्रवादी मध्ये गुलाम होऊन राहणारालाच सन्मान मिळतो,
भारतीय जनता पार्टी आणि आमदार प्रा.राम शिंदे यांच्याकडे नेहमीच सर्वांनाच सन्मानाची वागणुक मिळते या गोष्टीचाही आम्ही अनुभव घेतला आहे.
       २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात आश्वासन देऊन , दिशाभूल करून , अमिष दाखवुन आमचे मतं घेतली. आम्हीही या गोष्टींना बळी पडलो , ही आमची खुप मोठी चुक होती. आम्हीही आमच्या सोबत असलेल्या मतदार जनतेला यांच ऐकुण आश्वासन दिली. विकासाचे स्वप्न दाखवले. परंतु प्रत्यक्षात अस काही झाल नाही. त्यामुळे सर्वसामान्य मतदार नाराज झाला.
     मत घेताना सर्वांना जवळ घेतल निवडुन आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि पधादिका-यांनाच सोबत ठेवल जायच त्यांनाच विचारात घेतलं जात , आम्ही काही कामासाठी भेटायला गेलो तरी भाजपातुन आलेले आहेत. म्हणुन दुर ठेवलं जायचं , कामही त्यांनाच दिली जायची, आम्ही बोगस काम होत आहेत अशा तक्रारी केल्या तरी विकासकामात अडथळा आणु नका म्हणुन धमकावलं जायचं .कारण त्यांच्या जवळच्या लोकांना कामात भ्रष्टाचार करता यावा ,मनमानी पध्दतीने काम करता यावेतं,या गोष्टींची तक्रार आम्ही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडेही अनेक वेळा केली. तेही सांगायचे आम्हालाच विचारात घेतलं जात नाही तिथं तुम्हाला कोण विचारणार तुमचा तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही घेतलेला निर्णय योग्यचं असेल. कायम अपमानास्पद मिळणा-या वागणुकीला कंटाळुन आम्ही पुन्हा एकदा नव्या जोमाने आ. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं ठरवून  भाजपात प्रवेश केला आहे.आमच्याकडुन जी चुक २०१९ ला झाली त्याची दुरूस्ती आम्ही २०२४ ला करूनच दाखवु. असा जाहिर निर्धार यावेळी  राजुरी ,डोळेवाडी,एकबुर्जी, घुलेवस्ती,बांगरवस्ती आणि खर्डा परीसरातील उपस्थितांनी कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया देऊन त्यांच्या भावना व्यक्त केल्या

प्रतिक्रिया -  १

 भाजपा मध्ये जाहिर प्रवेश केल्यानंतर ,  आ.प्रा राम शिंदे  त्यांच्या नेतृत्वात गावाचा विकास करणार असल्याचा निर्धार आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केला आहे. 

- सुभाष काळदाते 
  माजी सरपंच राजूरी

प्रतिक्रिया - २

'राजुरी ,डोळेवाडी,एकबुर्जी,घुलेवस्ती,बांगरवस्ती आणि खर्डा परीसरातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला आहे.या सर्वांचे मी स्वागत केले आहे. या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देतानाच त्या भागातील प्रश्र प्राधान्याने सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे.'

- आमदार प्रा.राम शिंदे
Tags # ठळक बातम्या # राजकीय
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय
Posted at सोमवार, नोव्हेंबर २१, २०२२
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels ठळक बातम्या, राजकीय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगार बबलू गोलेकर तडीपार
    खर्डा प्रतिनिधी / २७ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गोंधळ व कायदा सुव्यवस्थेचा भंग टाळण्यासाठ...
  • दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या; जामखेडमधील धक्कादायक घटना
    ( खर्डा प्रतिनिधी) :8 ऑगस्ट2025 जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवार सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. रूपाली नाना उगले ...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • मोठी बातमी: अवैध वसुलीचा व्हिडीओ व्हायरल; शेंडी बायपासवर ट्रकचालकांकडून पैसे घेताना पोलीस निलंबित
    अहिल्यानगर (दि. ११ सप्टेंबर) –  आहिल्यानगरमधिल शेंडी बायपास परिसरात ट्रकचालकांकडून अवैधरित्या पैसे गोळा करणाऱ्या प्रकरणाचा व्ह...
  • धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनिधी/१८ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवा...
  • पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती ? जामखेड तालुक्यात सासरच्या छळाला कंटाळून मुलांसह आईची आत्महत्याखर्डा पोलीस स्टेशनला ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनधी 9 ऑगस्ट – 2025 नायगाव (ता. जामखेड) येथे पती, सासरे, ननंद आणि नंदाविरुद्ध हुंडा मागणी व मानसिक छळाच्या आरोपावर...
  • जामखेड बसस्थानकाजवळ बेवारस मृतदेह सापडला, संजय कोठारी यांनी पोलिसांना दिली माहिती ,परिसरात खळबळ
    जामखेड प्रतिनधी/8सप्टेंबर2025 जामखेड येथील बसस्थानकावरील शेडमध्ये एका अंदाजे ७५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले प...

Popular Posts

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

दुध दरवाढीच्या शासन निर्णयात सुधारणा करा - आ. प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेत मागणी

जामखेडमधील नऊ वर्षीय मुलीच्या मृत्यूचे विधानपरिषदेत पडसाद ! आ. प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केला तारांकित प्रश्न !

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

प्रशासनाची कठोर कारवाई: जिवंत व्यक्तीला मृत दाखवणारा ग्रामसेवक सेवेतून निलंबित

जामखेड येथील विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ: औंढा नागनाथमध्ये धक्कादायक घटना;गळफास घेऊन संपवलं आयुष्य

बीडच्या कारागृहात तूफान राडा, वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला महादेव गीते, व अक्षय आठवले यांनी केली मारहाण

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *