खर्डा प्रतिनिधी : १३ डिसेंबर
जामखेड तालुक्यातील जातेगाव येथील महिला व नागरिकांनी दारूबंदीसाठी आंदोलन अंदोलनाचा पावित्रा घेतला असून दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता जातेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरच या अंदोलनास सुरूवात करण्यात येणार आहे.
याबाबतचे रितसर निवेदन तहसीलदार योगेश चंद्रे व खर्डा पोलीस स्टेशनला देण्यात आले असून या निवेदनात म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील जातेगाव गावात शिवारात दारू व गुटखा मावा यांची अवैद्य विक्री होत असल्यामुळे गावातील अबाल वृद्ध व महिलाना याचा त्रास होत आहे. त्यामुळे सदर गाव शिवारातील किंवा गाव हदीतील अवैद्य धंदे संपूर्णपणे व कायमचे बंद व्हावेत या साठी आंदोलन करत आहोत. सदर निवेदनावर रविराज कमलाकर गायकवाड (पाटील) यांच्यासह शेकडो महिला व नागरीकांच्या सह्यां आहेत.
No comments:
Post a Comment