खर्डा प्रतिनधी : १३ डिसेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायत अंतर्गत सन २०२१-२२ या वर्षात अहमदनगर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या निधीतून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी ४४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या निधीतून खर्डा शहरातील अण्णाभाऊ साठे नगर, संत रोहिदास नगर, सकट वस्ती, ओंकारेश्वर नगर, गवळवाडी, दरडवाडी, मुंगेवाडी, नागोबाची वाडी येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये हे एलईडी हायमॅक्स दिवे बसविण्यात आल्याने हा परिसर रात्रीच्या अंधारात उजळून निघत आहे. या कामामुळे खर्डा ग्रामपंचायतच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यासाठी खर्डा ग्रामपंचायतचे सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी प्रयत्न करून हा निधी खेचून आणला. दि. १३ डिसेंबर रोजी खर्डा शहरातील सकट वस्ती येथे तेथील स्थानिक ज्येष्ठ नागरिक मोहन सकट यांच्या हस्ते नारळ फोडून एलईडी हायमॅक्स दिव्याचे उद्घाटन करण्यात आले
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे, सामाजिक कार्यकर्ते दत्तराज पवार, श्याम (महाराज) सकट, माजी ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब ढगे, विश्वास सकट, अक्षय सकट,गणेश मेहरकर,नूर आतार इत्यादी सह ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment