जेऊर प्रतिनिधी :१४ डिसेंबर
टेंभुर्णी (ता. माढा) गोविंद वृध्द आश्रम येथे विशेष सत्कार प्रसंगी संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. पी. आंबेगावे साहेब यांचे सुचनेनुसार संघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे साहेब उपाध्यक्ष नौशाद मुलाणी साहेब व संघाचे महिला जिल्हाध्यक्ष कर्णवर मॅडम यांचे हस्ते आले. शिवाजी मोरे यांना ता. अध्यक्ष म्हणुन नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या जेऊर (ता. करमाळा) शहराध्यापदी म्हणून सौ. माया कदम यांचीही यावेळी निवड करण्यात आली.
यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष खंडागळे साहेब यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की पत्रकरिता व सामाजिक क्षेत्रातील कार्याचे योगदान पाहून सदर नियुक्त्या केल्या आहेत. सदर प्रसंगी वृध्दाश्रम मध्ये श्री. शिवाजी मोरे (ता. अध्यक्ष) व कर्णवर मॅडम यांचे हस्ते खाऊ वाटप करण्यात आला. तसचे यावेळी नवनियुक्त ता. अध्यक्ष मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की समाजातील दुर्लक्षित घटकांचे प्रश्न आपल्या पत्रकारितेच्या माध्यामांतुन तिव्रतेने मांडण्याचा प्रयत्न केला जाईल व संघाच्या ध्येय धोरणानुसार पुढील कार्य केले जाईल. सदर कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवर व संघाचे पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment