खर्डा प्रतिनिधी :२६ डिसेंबर
देशातील ३६ राज्यांमधून सुमारे २ लाख किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करत व्यसनमुक्तीचा संदेश देत सायकल यात्रा करणारे सायकल यात्री अमनदिपसिंघ खालसा यांची सायकल यात्रा खर्डा
येथे पोहचली असाता त्यांचे खर्डा ग्रामस्थांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.
ग्रामपंचायतचे उपक्रमशील सदस्य महालिंग कोरे यांच्या वतीने या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र काळे, रसपाचे नेते गणेश सूळ, दिलीप सुरवसे, मच्छिंद्र गीते, पांडुरंग थोरात, रामभाऊ थोरात, अनिकेत जायभाय, प्रवीण कदम व पत्रकार दत्तराज पवार आदी मान्यवरांंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सायकल यात्री अमनदिपसिंह खालसा यांनी आपले स्वागत व सत्कार बाबत आभार व्यक्त करत पुढील प्रवासासाठी जामखेडकडे मार्गक्रमण केले. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment