जामखेड प्रतिनिधी : २३ डिसेंबर
जामखेड शहरातील परिट गल्ली येथील चेतन लक्ष्मण राळेभात यांच्या घरातून कोणीतरी अज्ञात चोरटयाने काल दि. २२ डिसेंबर रोजी रात्री १२: ३० ते रात्री ३ :०० वाजताचे सूमारास घराची दरवाज्याची कडी उघडून घरात प्रवेश करून स्टोअर रूम मधील चौरंगाखाली ठेवलेले २ लाख ५० हजार रुपये रोख व सोन्याचे गठण, मोहनमाळ, लॉकेट, अंगठी, नथ, मुरणी, छल्ला असे सोन्याचे चांदीचे दागिने (वर्णन व किंमत माहीत नाही) असा मोठा ऐवज चोरून नेला यानुसार चेतन राळेभात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील वर्णनाची व किमतीची रोख रक्कम व सोन्याची चांदीची दागिने ठेवलेली बॅग ही घरफोडी करून चोरून नेल्याबाबत अज्ञात चोरट्या विरूद्ध भादवी कलम 457 380 प्रमाणे गुन्हा रजिष्टरी दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे हे करत आहेत.
No comments:
Post a Comment