जामखेड प्रतिनिधी : २२ डिसेंबर
लातुर जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनला गंभिर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेला त्याचे विरुध्द जिल्हाधिकारी लातुर यांनी एम.पी.डी.ए. (स्थानबद्धता) प्रस्ताव केला असुन हा प्रस्ताव दि. १३ डिसेंबर रोजी मंजुर झाल्या पासुन फरार झालेला कुख्यात गुन्हेगार आकाश आण्णासाहेब व्होदाडे (वय २६ वर्ष) यास जेरबंद करण्यास जामखेड पोलीसांना यश आले असून त्यास एम. आय. डी. सी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली आहे.
या बाबत सविस्तर असे की, लातुर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला अनेक गुन्ह्यात व तडीपार असलेला कुख्यात गुन्हेगार आकाश आण्णासाहेब व्होदाडे वय २६ वर्ष रा.कवठा (केज) पो. भेटा ता. औसा जि.लातुर हा दि १९/१२/२०२२ रोजी जामखेड भागत असु शकतो, या बाबत पोलीस निरीक्षक एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन लातुर यांचे कडुन, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना माहीती मिळाली होती. त्याअनुशंगाने पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी याबाबत पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती व पथकास त्यासबंधाने योग्य त्या सुचना देवुन शोध घेणे बाबत कळविले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक भारती हे आपल्या पथकासह जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील जामखेड शहर हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान शोध घेत असताना तेथे एक इसम संशयीत रित्या फिरताना आढळल्याने, त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने सुरवातीला उडवा उडवीचे उत्तरे दिली. मात्र त्यानंतर त्यास व विश्वासात घेवुन तसेच एम. आय. डि.सी. पोलीस स्टेशन जि.लातुर याचेशी संपर्क साधुन खात्री झाल्याने व त्याने त्याचे नाव आकाश आण्णासाहेब व्होदाडे वय २६ वर्ष रा.कवठा (केज) पो. भेटा ता. औसा जि.लातुर असे असल्याचे सांगितल्याने त्याबाबत अधिक सखोल चौकशी केली असता त्याचेवर आज पावेतो अतिशय गंभिर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी आकाश आण्णासाहेब व्होदाडे वय २६ वर्ष रा.कवठा (केज) पो. भेटा ता. औसा जि.लातुर यावरून त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी एम. आय. डि.सी. पोलीस स्टेशन जि.लातुर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी अहमदनगरचे पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, कर्जत विभागाचे एस.डी.पी.ओ. आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती, चालक पोहेकॉ आरसुळ, पोकॉ एन.व्ही. शेकडे, एस.डी. दळवी, होमगार्ड भोसले यांच्या पथकाने केली आहे.
आकाश आण्णासाहेब व्होदाडे वय २६ वर्ष रा.कवठा (केज) पो. भेटा ता. औसा जि.लातुर याचेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दाखल असलेले गुन्हे व पोलीस स्टेशन
एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन जि.लातुर
१) गु.र.नं. ३४७/२०१८ भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे.
२) गु.र.नं. ६३ / २०१५ भा.द.वि. कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे.
३) गु.र.नं. ४८/२०१८भा.द.वि. कलम ३२५, ३२३, ५०४, ५०६ एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशन जि.लातुर प्रमाणे. गु.र.नं. ३२६ / २०१९ भा.द.वि. कलम ३०७ प्रमाणे
४)गु.र.नं. ३३ / २०२० भा.द.वि. कलम ३५३, ३३२ प्रमाणे.
५) गु.र.नं. २९५ / २०१६ भा.द.वि. कलम ३२७ प्रमाणे.
६) गु.र.नं. ४४८ / २०२० भा.द.वि. कलम ३०७ प्रमाणे.
७) गु.र.नं. ४९४/२०१७भा.द.वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६
प्रमाणे. गु.र.नं. २९७ / २०१७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे
पोलीस स्टेशन शिवाजी नगर जि.लातुर
१) गु.र.नं. ३७/२०१८ भा.द.वि. कलम ३०७ प्रमाणे.
२) गु.र.नं. १६१/२०१७ भा.द.वि. कलम ३०७ प्रमाणे. ३)गु.र.नं.३९/२०१६ भा.द.वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६
प्रमाणे. गु.र.नं. ४३७/२०१९ शासकिय मालमत्ता नुकसान कायदा
४) गु.र.नं. ३७/ २०१८ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२,१३५ प्रमाणे.
५) गु.र.नं. १६८/२०१५ भा.द.वि. कलम ३५४ (ड), पोक्सो कायदा कलम ४, १२ प्रमाणे.
६) गु.र.नं. २१/ २०२० भा.द.वि. कलम ३९५ प्रमाणे
औसा पोलीस स्टेशन जि.लातुर
गु.र.नं. २८५/२०१९ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे.
रेणापुर पोलीस स्टेशन जि.लातुर
गु.र.नं. १२८/२०२० भा.द.वि. कलम ३९५ प्रमाणे.
विवेकानंद चौक पोलीस स्टेशन जि.लातुर
गु.र.नं. २५४ / २०१७ भा.द.वि. कलम ३२७,३२४,३२३, ५०४, ५०६ प्रमाणे.
गांधी चौक पोलीस स्टेशन जि.लातुर
गु.र.नं. ६५३/२०१६ भा.द.वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे.
केज पोलीस स्टेशन जि.बीड
गु.र.नं. २५७/२०१९ भा.द.वि. कलम ३६५, ३६६,३७६ प्रमाणे
या जबरदस्त कामगिरीमुळे जामखेड पोलीसांचे कौतुक केले जात आहे.
No comments:
Post a Comment