खर्डा प्रतिनधी : २३ डिसेंबर
साधारण महिनाभरापूर्वी झालेल्या चोरीतील चोर व मुद्देमाल हस्तगत करण्यात खर्डा पोलीसांना यश आले आहे. दि. ११ नोव्हेंबर रोजी खर्डा येथील जुन्या ग्रामपंचायत परिसरात महिलेच्या गळ्यातील सोने चोरून नेणाऱ्या रोहन त्रिंबक ठाकरे रा. देवगाव, ता. परंडा या चोरास अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी दिली आहे.
सविस्तर असे की, दि. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी उस्मानाबाद जिल्हाच्या भुम तालुक्यातील नळीवडगाव येथील राहणाऱ्या काशीबाई सुखदेव राउत (वय ७० वर्ष) या खर्डा येथील बाहुबली साडी सेंटर मध्ये साडी घेण्यासाठी आल्या होत्या. त्या साधारण दुपारी ३:०० वाजताचे सूमारास खर्डा येथील जुनी ग्रामपंचायत इमारातीजवळ आल्या असता त्यांचे गळयातील सोन्याचे दागीने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी आज्ञात चोरट्या विरुध्द खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला होता.
त्यानंतर दि. २२ डिसेंबर रोजी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस काॅन्स्टेबल शशी म्हस्के, अशोक बडे हे तपास करीत असताना गुप्त बातमी दारामार्फत माहीती मिळाल्यानुसार आरोपी रोहन त्रिंबक ठाकरे रा. देवगाव, ता. परंडा जि. उस्मानाबाद यास ताब्यात घेवुण त्यांचे कडे चौकशी केली असता, त्यांने चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करुन पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान चोरी केलेले सोन्याचे दागीने काढुन दिले असल्याची माहिती सपोनि प्रकाश पाटील यांनी दिली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील व पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस काॅन्स्टेबल शशी म्हस्के, अशोक बडे यांच्या पोलीस पथकाने केली आहे, ,
No comments:
Post a Comment