खर्डा प्रतिनधी : २४ डिसेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील जायभायवाडी येथे दि. २३ डिसेंबर रोजी दुपारी १२ : ३० वाजेच्या सुमारास उमेश विश्वंबर जायभाय (वय ३०वर्ष) धंदा शेती रा. जायभायवाडी यांनी फिर्याद दिली की, या घटनेतील आरोपी पिकअप चालक इरफान हाशम कुरेशी (वय ३७ वर्ष) व आन्सार बादशाह कुरेशी (वय ४३वर्ष ) दोघेही रा.खर्डा यांनी पिकअप गाडी नंबर एम.एच.12 के.पी. 7642 हि मध्ये ४२००० रुपये किंमतीचे तांबडा व पांढऱ्या रंगाचे गावरान जातीचे दोन मोठे बैल
भरून कत्तलीसाठी बळजबरीने भरून वाहतुक करताना मिळुन आले यानुसार उमेश विश्वंबर जायभाय यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इरफान हाशम कुरेशी व आन्सार बादशाह कुरेशी
यांचेविरूध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 2015 चे कलम 5 (अ) 5 (ब) तसेच प्राण्यांना निर्दयतेणे वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम 3 व 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेत ४२००० रुपये किंमतीचे तांबडा व पांढऱ्या रंगाचे गावरान जातीचे दोन मोठे बैल, ८००० रुपये किंमतीचे ३ लहान वासरे २ ताबंड्या व एक काळ्या रंगाचे वासरे व २ लाख ५० हजार रुपये किंमतीचे एक पांढ-या रंगाचे पिकअप गाडी नंबर एम.एच.12 के.पी. 642 असा ३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
या घटनेचा पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्टेबल नागरगोजे करत आहेत.
No comments:
Post a Comment