जामखेड प्रतिनिधी : ४ डिसेंबर
अहमदनगर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी बाजीराव सानप यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या खात्यांतर्गत झालेल्या परिक्षेद्वारे पोलिस उपनिरीक्षकपदावर
झेप घेतली आहे.
नवनिर्वाचित उपनिरिक्षक बाजीराव सानप हे पाच वर्षांपूर्वी जामखेड पोलीस स्टेशनला कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले होते.
सन २०१७ ते २०२१ या काळात जामखेडमध्ये त्यांची पोलिस कॉन्स्टेबल' म्हणून कामगिरी कौतुकास्पद राहिली. त्याच वेळी त्यांनी पोलिस उपनिरीक्षकपदाची परिक्षा देण्याचा 'संकल्प' बोलून दाखविला होता. बाजीराव सानप हे शेजारील पाटोदा तालुक्यातील संत भगवान बाबांचे जन्मगाव असलेल्या
सावरगाव घाट येथील मुळ रहिवासी आहेत. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सानप यांनी पोलिस कॉन्स्टेबल म्हणून जामखेडला काम करताना विविध आघाड्यांवर जबाबदाऱ्या पार पाडल्या.
'डॅशिंग पोलिस कर्मचारी' म्हणून त्यांची त्यांची लोकप्रियता तर अधिकाऱ्यांचे विश्वासू सहकारी ख्याती आहे. जामखेडला त्यांना कौतुकाने बाजीराव 'सिंघम' म्हणून संबोधले जायचे. मुख्यालयात बदली झाली. हीच संधी समजून सानप यांनी चांगला अभ्यास केला. पहिल्याच प्रयत्नात पोलिस त्यांची खात्यांतर्गत पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली.
बाजीराव सानप यांच्या निवडीचे जामखेड तालुक्यातील बार असोसिएशनचे पदाधिकारी, पोलिस, पत्रकार, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जामखेड तालुक्याचे २ सुपुत्र फौजदार
पोलिस दलात जामखेड तालुक्यातील शिऊरचे रहिवासी पोलिस कॉन्स्टेबल विनोद फाळके व पोलिस कॉन्स्टेबल मुस्ताफा शेख यांची देखील फौजदारपदी निवड झाली आहे.
No comments:
Post a Comment