खर्डा प्रतिनिधी : १२ डिसेंबर
स्व. गोपीनाथ मुंडे हे जनसामान्यांचे नेते होते, त्यांनी त्यांच्या जीवनात केलेले काम व विचार त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन करून पुढे घेऊन जायचे आहेत. त्यांचे काम हे नेहमीच प्रेरणा देत राहिल असे प्रतिपादन आ.राम शिंदें यांनी केले.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत आ. प्रा. राम शिंदें बोलत होते.
याच वेळी आ. राम शिंदें यांनी आ. रोहित पवारांवर जोरदार टीका ही केली. यावेळी ते म्हणाले की आगामी २०२४ च्या निवडणुकीत आ. रोहित पवार यांचा पराभव करून सत्कार घ्यायला बारामतीला जायचे आहे. मागील निवडणुकीत तुम्ही बाहेरच पार्सल रोहित पवारांना निवडून दिलं व माझा पराभव केला,परंतु तुम्ही माझी व तुमची पण जिरवली आहे. आता मतदारसंघात त्यांच्याकडून दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. आ. रोहित पवारांनी गेल्या अडीच वर्षात कोणालाही मानसन्मान दिलाच नाही. आता मी तर पुन्हा आलोच पण त्याच दिवशी सरकारही आलं. आता भाजप वचे सरकार आल्याने त्यांच्या ते घाबरून गेले आहेत. त्यामुळे ते त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून फोन करून बोलवत आहेत. आगामी निवडणुकीत आ. रोहित पवारांचा पराभव करून मी मागील पराभवाच्या वेळेस केलेला सत्काराची पुन्हा बारामतीला जाऊन सत्कार घेऊन जनतेच्या आशिर्वादाने परतफेड करणार असल्याची खरमरीत टीका आ. राम शिंदे यांनी केली.
खर्डा येथे स्व. नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अभिवादन सभेसाठी भाजपाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र सुरवसे, तालुकाध्यक्ष अजय काशीद, माजी जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल खिवंसरा, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शरद कार्ले, वैजनाथ पाटील, ग्रा.सदस्य राजू मोरे, सोपान गोपळघरे ,नाना गोपळघरे, गहिनीनाथ गीते, मदन गोलेकर, बाजीराव गोपाळघरे, दत्तात्रय चिंचकर, नामदेव गोपाळघरे, अशोक गीते, संतोष गोपाळघरे, आणि पत्रकार व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
No comments:
Post a Comment