खर्डा प्रतिनधी : २ डिसेंबर
निवडणुकीच्या अगोदर, निवडणूक झाल्यावर व त्यानंतर गेल्या वर्षी तुम्ही जसे बोललात तसे झाले त्यामुळे लोकांना आपल्या बद्दल आणखी विश्वास पटलाय. लोक म्हटले पुढे चालून माझा वाढदिवस हा फेस्टिव्हल होईल. पण याच वर्षी ७ दिवसांचा सप्ताह बसलाय. माझा वाढदिवस गेली सात दिवस सुरू आहे. अशा प्रकारे जनतेचे प्रेम मिळायला सुद्धा नशीब लागत. माझ्या अडचणींच्या काळात, माझ्या दुःखाच्या काळात तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलात. मी तुमच्या प्रति मनातून श्रद्धा आणि निष्ठा ठेवून गेली अनेक वर्ष जे काम केले, त्याचे प्रतिबिंब म्हणून पक्षाने व नेतृत्वाने मला पुन्हा एकदा विधान परिषदेवर पाठवलं. नुसतं विधान परिषदेवर पाठवले नाही तर त्याच दिवशी राज्यात आपलं सरकार आलंय. काय होईल किंवा नाही होईल (मंत्रीपद) मला माहित नाही, पण आदरणीय दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा पठ्ठ्या आहे. कोणतेही पद आलं तरी राम शिंदे आहेच. पद मिळेल की नाही मिळेल याची मला परवा नाही. मला परवा तुमची आहे. त्यामुळे माझ्या हातून कुठलेही काहीही न घडता या जनतेची सेवा घडावी, अशी मी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुमचं असेच प्रेम माझ्यावर माझ्या कार्यकर्त्यांवर व पदाधिकाऱ्यांवर ठेवावं. अशी मी प्रार्थना करून तुम्हाला नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो असे प्रतिपादन आ. प्रा. राम शिंदे यांनी केले.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने
आ.राम शिंदें यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य असा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी सिने अभिनेत्री तेजा देवकर व गायकांचा बुलंद आवाज साजन बेंद्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी उपस्थितीत भाजपाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र सुरवसे, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीद, युवा मोर्चा अध्यक्ष शरद कार्ले,मा.पं.स.सदस्य कांतीलाल खिवंसरा, वैजीनाथ पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष अभिजीत राळेभात, भाजपा मिडीया सेल तालुकाध्यक्ष दत्तात्रय चिंचकर, बाजीराव गोपाळघरे, नानासाहेब गोपाळघरे, पांडुरंग उबाळे, बाळासाहेब गोपाळघरे, मोहन गडदे मामा, तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी व आ. शिंदे यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नागरिकांचीही मोठी गर्दी पाहायला मिळाली.
यावेळी पुढे बोलताना आ. राम शिंदे यांनी म्हणाले की, साजन बेंद्रे यांनी गेल्या वेळेसचे गाणे गायले अगदी तसेच झाले, त्यावेळी साजन बेंद्रे म्हटले होते. मी आजवर जेवढ्या नेत्यांचे गाणे म्हटलं तेवढे निवडूनच आलेले आहेत आणि पुढच्या वेळेस असंच कार्यक्रम होणार साहेब आणि तसंच झालं मी पुन्हा आलो. त्याच दिवशी सरकार पण आलं असेही मत आ. राम शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी मोठी गर्दी झाल्याने खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने मोठ्या जल्लोष पुर्ण घोषणा, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
No comments:
Post a Comment