खर्डा प्रतिनधी : १५ जानेवारी
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन मार्फत राबवण्यात येणाऱ्या "रस्ता सुरक्षा अभियान २०२३" अंतर्गत आज दि. १५ जानेवारी रोजी पोलीस स्टेशन हद्दीतील २५ वाहन चालकांची
वैद्यकीय तपासणी करण्यात आली. खर्डा पोलीस स्टेशनच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे वाहनधारकांकडून स्वागत करण्यात येत आहे
दि. ११ ते १७ जानेवारी २०२३ या कालावधी दरम्यान खर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने "रस्ता सुरक्षा अभियान २०२३" राबविण्यात येत आहे. या निमित्त आज दि. १५ जानेवारी रोजी खर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरणकुमार जाधव यांच्या माध्यमातून खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील २५ वाहन चालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, कॉन्स्टेबल सय्यद,पोलीस नाईक संभाजी शेंडे, काॅन्स्टेबल वैजीनाथ मिसाळ, शेषराव म्हस्के, बाळासाहेब खाडे ,महिला काॅन्स्टेबल अयोध्या पोकळे हजर होते.
खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांची सुरक्षा व प्रबोधन करणेकामी खर्डा पोलीस स्टेशन हे कमालीचे कृतीशिल झाले असून. आजच्या वाहन चालकांच्या वैद्यकीय तपासणी बरोबरच पोलीस रेझींग डे सप्ताह निमित्ताने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिला व नागरिक यांची सुरक्षा व जनजागृती तसेच ट्रॅफिक कंट्रोलींग अशा विषयावर विविध उपक्रम राबवून सर्व खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना सुरक्षा पुरवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असा विश्वास निर्माण करून देण्यात खर्डा पोलीस यशस्वी झाले आहेत.
खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील व पोलीस कर्मचारी हे करत असलेल्या उपाययोजनांमुळे पंचक्रोशीतील गुन्हेगारी कमी झाल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व जनतेतून व्यक्त केल्या जात आहेत.
No comments:
Post a Comment