खर्डा प्रतिनधी:१६जानेवारी
खर्डा येथील श्री संत गजानन महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या वतीने भूगोल दिनाचे औचित्य साधून संस्थेचे सचिव डॉ. महेशजी गोलेकर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध पर्यावरण पूरक भित्तिपत्रकाचे प्रदर्शन करण्यात आले.
नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवून मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी काम करणाऱ्या श्री संत गजानन महाविद्यालयात आज भूगोल दिन साजरा करण्यात आला
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओंकार खिस्ते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदिनाथ खेडकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य किरण खेडकर, सौ वैशाली कुलकर्णी, मराठी विभाग प्रमुख श्रीकांत तनपुरे, हिंदी विभाग प्रमुख मोहसीन शेख, ग्रंथपाल महेश बजगुडे सह विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
No comments:
Post a Comment