जामखेड प्रतिनिधी : २८ जानेवारी
जामखेड येथील व्यापारी अंदुरे कुटुंबावर केलेल्या हल्ला प्रकरणातील आरोपी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांना अखेर अटक करण्यात आली असून
आज जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे. भगवान मुरुमकर हे तीन महिने फरार होते. या प्रकरणातील आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्यापही फरार आहे.
या बाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांच्या सह त्यांच्या इतर सहा आरोपींवर व्यापारी अंदुरे कुटुंबियांवर हल्ला प्रकरणी तीन महिन्यांपुर्वी गुन्हा दाखल झाला होता. या घटनेतील आरोपी विक्रम भगवान डाडर, सोनू बबन वाघमारे, सागर सतिश डिसले, अमोल किसन आजबे, सागर बापुराव टकले अशा पाच आरोपींना यापुर्वी अटक केली होती. तर डॉ भगवान मुरूमकर व भरत पांडुरंग जगदाळे हे आरोपी फरार होते.
या गुन्ह्यात नुकतीच अटक करण्यात आलेले डॉ. भगवान मुरूमकर हे बीड जिल्ह्यातील पाटोदा परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस नाईक अविनाश ढेरे, संग्राम जाधव, पोलीस कॉन्टेबल आबासाहेब आवारे, पो. काँ. राऊत, संदीप आजबे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन डॉ. भगवान मुरूमकर यांना आज दि. २८ रोजी पहाटे २.३० च्या सुमारास अटक केली.
त्यांना आज जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. ३१ जानेवारी पर्यंत चार दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे. या घटनेतील आरोपी भरत पांडुरंग जगदाळे अद्याप फरार आहे. या घटनेचा तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड करत आहेत.
चौकट
डॉ. भगवान मुरूमकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल
माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांना दि. २६ जानेवारी रोजी रात्री जामखेड पोलीसांनी ताब्यात घेतले होते. पण त्यांच्या साथीदारांनी पोलीसांशी हुज्जत घालत व झटापट करत खर्डा परिसरातून आरोपीला घेऊन पळून गेले होते. त्यामुळे डॉ. भगवान मुरूमकर यांच्या वर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे डॉ भगवान मुरुमकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
No comments:
Post a Comment